28 October 2020

News Flash

मूर्खपणाचा कळस; जनता कर्फ्यूचा विरोधाभास – रिचा चढ्ढा भडकली

गर्दी न करण्याच्या सूचना देऊनही रस्त्यांवर झाला जल्लोश

“हा तर मूर्खपणाचा कळस आहे” असं म्हणत अभिनेत्री रिचा चढ्ढा हिने जनता कर्फ्यूवर आपला संताप व्यक्त केला आहे. करोना विषाणूविरोधात जीवाचा धोका पत्करुन लढणारे डॉक्टर, नर्सेस, वैद्यकीय स्टाफ, पोलीस आणि इतर कर्मचाऱ्यांचे टाळ्या आणि थाळ्या वाजवून आभार मानण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. या आवाहनला जनतेने देखील चांगला प्रतिसाद दिला. मात्र काही अतिउत्साही लोकांनी रस्त्यांवर उतरुन जल्लोश केला. या प्रकारावर बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढा संतापली आहे.

काय म्हणाली रिचा चढ्ढा?

रिचाने एक व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओमध्ये रस्त्यावर गर्दी करुन थाळ्या वाजवत जल्लोष करणारे लोक दिसत आहेत. “हा तर मुर्खपणाचा कळस आहे. जनता कर्फ्यूचा विरोधाभास या व्हिडीओमध्ये दिसत आहे.” अशा आशयाची कॉमेंट रिचाने या ट्विटवर केली आहे.

अभिनेत्री रिचा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर ती आपली मते रोखठोकपणे मांडताना दिसते. या पार्श्वभूमीवर रिचाने पोस्ट केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यापूर्वी दिग्दर्शक केन घोष, ओनिर, रोनित रॉय यांनी देखील असे व्हिडीओ पोस्ट करुन लोकांच्या जल्लोशावर आपला संताप व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 23, 2020 11:25 am

Web Title: bollywood actress richa chadda share viral video about janta curfew mppg 94
Next Stories
1 ‘करोना’से लागे ना डर; मालदीवमध्ये हंसिका घेतेय सुट्टीचा आनंद
2 Coronavirus : खरे हिरो! नचिकेत बर्वेच्या आईवडिलांचा आदर्श घ्या
3 ‘मी टू’ आरोपांचा दोषी असलेल्या निर्मात्याला करोनाची लागण
Just Now!
X