अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याच्या चर्चा थांबत नाहीत तोच आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीला याची लागण झाली आहे. त्यामुळे कामाच्या व्यापापासून ती दूरच राहणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र प्रकृती ठिक नसतानाही ती आगामी ‘फुकरे रिटर्न्स’ चित्रपटाचं प्रमोशन करतेय. यावेळी तिच्या प्रकृतीविषयी विचारणा केली असता ती म्हणाली, ‘हो, मी आता ठीक आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जावंच लागणार होतं. थोडा अशक्तपणा जाणवतोय, पण मी ठीक आहे.’

युएसएहून परतल्यानंतर रिचाला स्वाईन फ्लू झाला. ‘फुकरे रिटर्न्स’च्या प्रमोशन कार्यक्रमात रिचाने मास्क लावला होता. युएसएहून परतल्यानंतर लगेचच आजारी पडली आणि तपासात H1N1 चं निदान झाल्याचं रिचाने स्पष्ट केलं. मास्क लावलेलाच एक फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला.

https://www.instagram.com/p/BXYAOy4hiVG/

स्वाईन फ्लूचं वाढतं प्रमाण पाहता सध्या या रोगाची प्रचंड दहशत पाहायला मिळत आहे. त्यामुळे सध्या देशभरात स्वाईन फ्लूचा कहर माजलाय, असंच म्हणावं लागेल. कारण यंदा जून महिन्याच्या अखेरपर्यंत १३ हजार १८८ लोकांना स्वाईन फ्लूची लागण झाली होती. तर देशभरात स्वाईन फ्लूमुळे ६३० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत स्वाईन फ्लूमुळे मृत्यू होण्याचं प्रमाण दुपटीनं वाढलं आहे. एच१ एन१ या विषाणूंमुळे स्वाईन फ्लू होतो.

वाचा : ‘पुरुषांना मासिक पाळी आली असती तर सॅनिटरी नॅपकिनवर कर आकारला नसता’

दरम्यान, गेल्या बऱ्याच दिवसांपासून स्वाईन फ्लूविषयी विशेष काळजी घेण्याचं पालिकेद्वारेही सांगण्यात येत आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असलेल्यांना या आजाराची लगेचच लागण होत असल्यामुळे याविषयी काळजी घेणं फार गरजेचं आहे. त्यासोबतच गर्भवती महिला, वयोवृद्ध, लहान मुले याशिवाय मधुमेही, रक्तदाबाचे रुग्ण यांनी अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचं वारंवार सांगण्यात येत आहे.