25 February 2021

News Flash

Shakeela biopic : शकीलाच्या आयुष्यातील खास व्यक्तीची भूमिका साकारणार ‘हा’ अभिनेता

तो मॉडेलिंग विश्वातही सक्रिय आहे. काही आंतरराष्ट्रीय ब्रँडसाठीही त्याने मॉडेलिंग केलं आहे.

रिचा चड्ढा, richa chadha

मेलबर्नमध्ये पार पडलेल्या भारतीय चित्रपट महोत्सवाला हजेरी लावल्यानंतर अभिनेत्री रिचा चड्ढा भारतात परतली आहे. सध्याच्या घडीला रिचा अतिशय महत्त्वाच्या अशा दोन प्रोजेक्टमध्ये व्यग्र असून, त्यामुळेच प्रकाशझोतात आली आहे. ‘इनसाईड एज २’ या वेब सीरिजसोबतच ती दाक्षिणात्य अडल्ट स्टार शकिलाच्या आयुष्यावर साकारल्या जाणाऱ्या चित्रपटातही महत्त्वाची भूमिका साकारत आहे.

काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील तिच्या फर्स्ट लूकवरुन पडदा उचलण्यात आला होता. त्यानंतर खुद्द रिचाने शकिला यांची भेटही घेतली होती. आता तिच्या या महत्त्वाकांक्षी चित्रपटाची चर्चा होण्याचं कारण म्हणजे शकीलामध्ये तिच्यासोबत झळकणारा अभिनेता. शकिलाच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या प्रसंगांवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटातून तिच्या खासगी आयुष्यावरुनही पडदा उचलण्यात येणार आहे. ज्याकरता मल्याळम अभिनेता राजीव पिल्लई याची निवड करण्यात आली आहे. शकीलाच्या आयुष्यात प्रेमाची आणि हक्काची अशी एक व्यक्ती होती, ज्याची भूमिका साकारण्यासाठी राजीवच्या नावाला प्राधान्य देण्यात आलं आहे.

वाचा : मानधन न स्विकारताही आमिर असा कमावतो बक्कळ नफा

२०११ मध्ये राजीवने ‘सिटी ऑफ गॉड’ या थरारपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्याशिवाय तो मॉडेलिंग विश्वातही सक्रिय आहे. काही आंतरराष्ट्रीय ब्रँडसाठीही त्याने मॉडेलिंग केलं आहे. तेव्हा आता शकिलाच्या बायोपिकमध्ये राजीवची भूमिका नेमकी कशी असणार आणि त्या भूमिकेतून तो प्रेक्षकांची मनं जिंकणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 24, 2018 3:46 pm

Web Title: bollywood actress richa chadha to romance malayalam actor rajeev pillai in shakeela biopic
Next Stories
1 विजय चव्हाण आजारी असताना किती कलाकार भेटले? दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी फटकारले
2 ‘मोरूच्या मावशी’सोबत पुरुष प्रसाधनगृहात घडला होता भन्नाट किस्सा
3 सलमानच्या घरातील ‘या’ सदस्यावर बायोपिक व्हावा -नोरा फतेही
Just Now!
X