News Flash

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचं निधन, ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

खलनायिकेच्या भूमिका गाजल्या होत्या.

बॉलिवूडच्या जेष्ठ अभिनेत्री शशिकला यांचं आज निधन झालं. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राहत्या घरात दुपारी 12 च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. 70 च्या दशकात अनेक सिनेमांमधून शशिकला यांनी त्यांच्या अभिनयाची छाप उमटवली आहे.

शशीकला यांनी जवळपास 100 हून अधिक सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. सिनेमातील नायिकेच्या भूमिकेसोबतच खलनायिकेच्या भूमिकेतूनही त्यांनी प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. मुळच्या सोलापूरच्या असलेल्या शशिकला यांचं संपूर्ण नाव शशिकला जवळकर असं होतं. ओमप्रकाश सैगल यांच्याशी नंतर त्यांनी विवाह केला. शशिकला यांना लहानपणापासूनच नृत्य आणि अभिनयाची आवड होती. वयाच्या पाचव्या वर्षापासूनच त्यांनी नृत्य शिकण्यास सुरुवात केली होती.

शशिकला यांच्या वडिलांचं उद्योगात मोठं नुकसान झाल्याने त्यांचं संपूर्ण कुटूंब काम शोधण्यासाठी मुंबईत आलं. याचवेळी त्यांची भेट लोकप्रिय गायिका-नूरजहाँ यांच्याशी झाली. नूरजहाँचे पतीच दिग्दर्शित करीत असलेल्या ‘झिनत’ या चित्रपटात कव्वालीच्या सीनमध्ये शशिकला यांना संधी मिळाली. त्यानंतर व्ही. शांताराम यांच्या ‘तीन बत्ती चार रास्तामध्ये’ त्यांनी एक भूमिका साकारली.

आरती, गूहराह, फूल और पत्थर यासारख्या सिनेमांमध्ये त्यांनी साकारलेल्या खलनायिकेच्या भूमिका चांगल्याचं गाजल्या. यानंतर त्यांना खलनायिकेच्या भूमिका अधिक मिळू लागल्या. आरती आणि गुमरा सिनेमाती भूमिकांसाठी तर त्यांना ‘फिल्मफेअर’ पुरस्कार मिळाला होता. तर 2007 साली सिनेसृष्टीतील त्यांच्या योगदानासाठी त्यांना भारत सरकारच्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

शशिकला यांनी ओम प्रकाश सैगल यांच्यासोबत प्रेम विवाह केला होता. त्यांना दोन मुली आहेत. 2005 सालात आलेला ‘पद्मश्री लालूप्रसाद यादव’ हा त्यांचा शेवटचा सिनेमा होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2021 4:47 pm

Web Title: bollywood actress shashikala siagal passed away at the age of 88 in her own house kpw 89
Next Stories
1 नेहा धुपियाने शेअर केला दिल्ली विमानतळावरील फोटो; म्हणाली “आता तरी सुधरा”
2 विराट-अनुष्कावर अमिताभ यांनी केला विनोद, म्हणाले…
3 मालिकेतील या अभिनेत्रीवर आली कांदे-बटाटे विकण्याची वेळ, गिरीजाने शेअर केला व्हिडीओ
Just Now!
X