05 June 2020

News Flash

शेफाली शहाचं फेसबुक अकाउंट हॅक; करोना झाल्याची पसरवली अफवा

भारतात गेल्या २४ तासात करोनाचे ७७३ नवे रुग्ण आढळले आहेत

शेफाली शहा

करोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत जगातील हजारो लोकांना करोनाची लागण झाली आहे. यामध्ये काही बॉलिवूड कलाकारांचाही समावेश आहे. त्यातच अभिनेत्री शेफाली शहालादेखील करोनाची लागण झाल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली होती. याविषयी शेफालीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत ती करोनाग्रस्त नसल्याचं  सांगितलं आहे.

काही दिवसांपूर्वी शेफालीच्या फेसबुक अकाऊंटवरुन तिला करोना झाल्याची माहिती पोस्ट करण्यात आली होती. ही माहिती वाचल्यानंतर अनेकांनी फोन,मेसेजच्या माध्यमातून तिची चौकशी केली.  मात्र ‘मला करोनाची लागण झाली नसून मी ठीक आहे. माझं फेसबुक अकाऊंट कोणी तरी हॅक करुन ही अफवा पसरवली होती’, असं शेफालीने इन्स्टाग्रामवर पोस्ट करुन सांगितलं आहे.

“माझं फेसबुक अकाऊंट रात्रीच हॅक करण्यात आलं होतं. याविषयी मला जरा पण कल्पना नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर मला अनेकांचे मेसेज आले होते. ज्यात प्रत्येकाने चिंता व्यक्त केली होती. इतकंच नाही तर अनेकांनी मदत हवी असल्याचं जरुर सांग असंही म्हटंल होतं. काहींनी त्यांचे फोन नंबर सुद्धा मला शेअर केले होते. परंतु मी घरी आहे आणि माझी प्रकृतीही व्यवस्थित आहे. इतरांप्रमाणेच मीदेखील या परिस्थितीशी लढा देत आहे”, असं शेफाली म्हणाली.

 

View this post on Instagram

 

My FB account was hacked last night and I woke up to a flurry of messages of concern of care of people reaching out and saying wonderful things to me and saying that if I need to talk I should call. Some people even shared their telephone numbers. These are people I’ve met, probably never met or met briefly, or occasionally sometime somewhere. of them and all of them just showed care and concern. A lot of them in fact also said this doesn’t sound like you it’s not a positive voice and it just doesn’t sound like you and we are hoping your account (not good) but rather hacked than you ever saying something like this. Because you’re valuable and precious. It was so heart warming to see these messages from strangers from acquaintances from friends and it was lovely to know that people reach out to you when they sense you need them or just because they care. I don’t think they did it just because I’m an actor they just did it because they care about a fellow human being. I want to say that I’m absolutely fine. And dealing with this entire situation as well as everyone else is dealing with it. dealing. I’m fine and I would never think of something so drastically negative. All of us at home are fine and safe we are not corona positive as was one of the things that was written in my post. (By god knows who.) Thank you all. Thank you so much for reaching out and being there it means a lot to me. #ThankYou #Gratitude #Kindness #Positivity

A post shared by Shefali Shah (@shefalishahofficial) on

पुढे ती म्हणते, “मला करोनाची लागण झाली नाहीये. कोणीतरी माझ् अकाऊंट हॅक करुन ही खोटी माहिती पसरवली आहे. परंतु ज्यांनी ज्यांनी मेसेज करुन माझी चौकशी केली त्या सगळ्यांचे आभार”. सध्या शेफाली इन्स्टाग्रामवरुन चाहत्यांच्या संपर्कात आहे आणि तेथूनच ती सगळे अपडेट चाहत्यांना देत आहे. शेफाली घरी असून सुरक्षित आहे. घरात राहून ती अनेक व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत आहे.

दरम्यान,शेफाली लोकप्रिय अभिनेत्री असून तिने ‘दिल धडकने दो’ ,’वो रंगीला’,’सत्या’ अशा चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तर ‘दिल्ली क्राइम’ या सीरिजमध्येही ती झळकली आहे. सध्या भारतात गेल्या २४ तासात करोनाचे ७७३ नवे रुग्ण आढळले असून ३५ मृत्यूंची नोंद झाली आहे. भारतातील करोनाबाधितांची संख्या ५१९४ वर पोहोचली आहेत. तर मृतांची संख्या १४९ झाली आहे. ४०१ जणांवर उपचार करुन त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2020 11:20 am

Web Title: bollywood actress shefali shah facebook account hacked ssj 93
टॅग Coronavirus
Next Stories
1 दूरदर्शनवरील लोकप्रिय मालिका ‘जंगल बुक’ पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला
2 नागार्जुनच्या मुलाचं साखरपुड्यानंतर मोडलेलं लग्न; इटलीत होणार होतं डेस्टिनेशन वेडिंग
3 देश करोनामुक्त होऊ दे..अलका कुबल यांनी काळूबाईला केला नवस
Just Now!
X