News Flash

शिल्पाच्या ‘मेटॅलिक साडी’ची चर्चा

साडीमध्येही काही कलात्मक प्रयोग करण्यात येत आहेत

शिल्पा शेट्टी

‘दिलवालों के दिल का करार लूटने’ असं म्हणत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. ती गेल्या बऱ्याच काळापासून चित्रपट विश्वात सक्रिय नाही. पण, तरीही रिअॅलिटी शोच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येते. त्याशिवाय फिटनेस, योगविषयीसुद्धा ती चाहत्यांना टीप्स देतच असते. बॉलिवूड वर्तुळात आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांना हजेरी लावत, सोशल मीडियावर त्याविषयीचे काही फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करतही शिल्पा तिचे ‘फॅशन गोल्स’ सर्वांसमोर ठेवतेय. अशाच एका कार्यक्रमासाठी गेलेल्या शिल्पाच्या स्टाईल स्टेटमेंटवर फॅशन जगताच्या नजरा खिळल्या आहेत.

साडी हा महिला वर्गात सर्वाधिक पसंती मिळणारा पोशाख आहे. गेल्या काही वर्षांमध्ये साडीमध्येही काही कलात्मक प्रयोग करत फॅशन डिझायनर्सने किमया केल्याचे पाहायला मिळाले. त्याचीच एक झलक शिल्पाच्या साडीतही पाहायला मिळाली. कारण तिने एका कार्यक्रमासाठी चक्क मेटॅलिक साडी नेसली होती. या लूकमध्ये शिल्पाने ट्राऊजर साडीसोबत फ्यूजन कॉम्बो केला होता. किरण उत्तम घोष या फॅशन डिझायनरने ही साडी डिझाईन केली होती. ‘अँटिक सिल्व्हर मेटॅलिक साडी’, असे या साडीचे नाव असून, शिल्पावर ती अगदी सुरेख दिसत होती. सोशल मीडियावर रंगणाऱ्या चर्चांमध्ये या साडीची किंमत ४० हजारांच्या घरात असल्याचे म्हटले जातेय. साडीची खरी किंमत काय हे मात्र अद्यापही उघड झालेले नाही.

पाहा : Throwback Thursday : जुन्या जाहिरातींचा खजाना

मेटॅलिक साडीतील शिल्पाचे स्टायलिंग सेलिब्रिटी स्टायलिस्ट मोहित रायने केले होते. तर साडीवर शिल्पाने घातलेले अलंकार रेनी ऑबेरॉयने डिझाईन केले होते. शिल्पाचा हा लूक सोशल मीडियावर अनेकांचीच मनं जिंकून गेला. तेव्हा आता या बी टाऊन स्टाईल आयकॉनपासून प्रेरित होऊन कितीजणी मेटॅलिक साडीचा ट्रेंड फॉलो करतात हे येत्या काळात कळेलच. पण, फॅशन जगतातील ही प्रयोगशीलता खरंच कौतुकास्पद आहे असे म्हणायला हरकत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2018 12:08 pm

Web Title: bollywood actress shilpa shetty wear metallic sari
Next Stories
1 तापसी पन्नूच्या ब्रेकअपची अफवा
2 ‘वयाच्या २० व्या वर्षापासूनच मासिक पाळीविषयी माहिती होती’
3 ‘एक बॉम्ब कमी तयार करा, पण सॅनिटरी नॅपकिन मोफत द्या’
Just Now!
X