24 September 2020

News Flash

सोनाक्षी कोणाला जीवे मारण्याचा बेत आखतेय?

ही तिची सुप्त इच्छा आहे.

सोनाक्षी सिन्हा

सेलिब्रिटी चॅट शो म्हणजे अनेकांच्याच आवडीचा विषय. आपल्या आवडत्या सेलिब्रिटींच्या दिलखुलास गप्पा आणि त्यांचा कधीही न पाहिलेला अंजाज पाहायला मिळतो. अशाच काही चॅट शोच्या यादीतील एक कार्यक्रम म्हणजे ‘नो फिल्टर नेहा’ #NoFilterNeha. अभिनेत्री नेहा धुपियाच्या या ऑडिओ चॅट शोमध्ये बऱ्याच सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. यामध्ये आता आणखी एका सेलिब्रिटीचा समावेश झाला आहे. ‘दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हाने नुकतंच नेहाच्या या कार्यक्रमात हजेरी लावत दिलखुलास गप्पा मारल्या.

नेहासोबतच्या प्रश्नांना उत्तरं देत आणि दिलखुलास गप्पा मारत सोनाक्षीने तिच्याबाबतचे बरेच खुलासेही केले. सोनाक्षीने स्वत:बद्दल सांगितलेल्या या गोष्टी ऐकून सध्या अनेकांना धक्काच बसेल. सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असणाऱ्या सोनाक्षीने या गप्पांमध्ये तिचं सेल्फी प्रेमही सांगितलं. ‘माझ्या मते मीच सेल्फी या संकल्पनेचा शोध लावला आहे. माझ्याकडे आधीसुद्धा नेहमीच डिजिटल कॅमेरा असायचा. जो फोटो काढते वेळी मी नेहमीच उलटा करुन स्वत:चा फोटो काढायचे’, असं ती म्हणाली.

वाचा : माहेरचा गणपती : चैतन्य, भरभराट आणि उत्साहाची उधळण करणारा माझा नवसाचा बाप्पा- अक्षया गुरव

सोशल मीडियावर एकमेकांच्या अकाऊंटवर नजर ठेवणं हा अनेकांचाच छंद असतो. सोनाक्षीसुद्धा त्यातीलच एक आहे. यामध्ये ती स्वत:ला अग्रस्थानीच पाहते. हे खुद्द सोनाक्षीनेच नेहाच्या चॅट शोमध्ये मान्य केलंय. नेहासोबतच्या गप्पांमध्ये सोनाक्षीने तिच्या मनातील सुप्त इच्छाही सर्वांसमोर उघड केली. यामध्ये आपल्याला कोणाचातरी जीव घ्यायची इच्छा आहे, असंही तिने स्पष्ट केलं. सोनाक्षीची ही इच्छा इतरांसाठी तशी घातकच आहे. पण, असो ही तिची सुप्त इच्छा आहे.

View this post on Instagram

Caught in a moment…

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona) on

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2017 8:48 pm

Web Title: bollywood actress sonakshi sinha admits being a stalker and her wish is to murder someone no filter neha
Next Stories
1 संजय दत्तच्या मुलीची ‘ही’ ओळख तुम्हाला माहितीये का?
2 VIDEO : ‘तेरे बिना’ गाण्यात श्रद्धा आणि अंकुरचा रोमॅण्टिक अंदाज
3 गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि किंग खानमध्ये रंगणार चर्चा
Just Now!
X