News Flash

‘हो ही मीच आहे आणि हे आहेत माझे आधारस्तंभ’, ‘फ्रेंडशिप डे’च्या दिवशी सोनालीची भावनिक पोस्ट

आपल्या आयुष्याकडे वेगळ्या आणि सकारात्मक दृष्टीने पाहणाऱ्या सोनालीने फोटोसोबत एक टीपही लिहिली आहे.

sonali bendre
छाया सौजन्य- सोनाली बेंद्रे / इन्स्टाग्राम

Friendship day 2018 . फ्रेंडशिपच्या निमित्ताने सर्वजण काही ना काही फोटो पोस्ट करत असतानाच अभिनेत्री सोनाली बेंद्रेसुद्धा Sonali Bendre यात मागे राहिलेली नाही. सोनालीनेसुद्धा तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट करत आपल्या मैत्रिणींसोबतचं नातं सर्वांसमोर आणलं.

प्रत्येकाच्याच आयुष्यात येणारे मित्र हे विविध कारणांनी आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनून जातात. कित्येकदा ते आपले आधारस्तंभही असतात. अशाच आपल्या आधारस्तंभाशी सोनालीने चाहत्यांची भेट घालून दिली आहे. मुख्य म्हणजे काही काळापूर्वी सोनालीने तिचा नवा लूक सर्वांसमोर आणला होता. उपचारांसाठी म्हणून तिने आता केस पूर्णपणे कापले असून आहेत. तिच्या चेहऱ्यावरचं तेज आणि ओसंडून वाहणारा उत्साह अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे, असं म्हणणं वावगं ठरणार आही.

‘आपण आता प्रत्येक क्षणाचा मनमुराद आनंद लुटण्यास सुरुवात केली आहे. हो, ही मीच आहे आणि मी प्रचंड आनंदात आहे. हे अगदी खरं आहे आणि मी तुम्हाला यामागचं कारणही सांगते, आनंद मिळवण्याच्या प्रत्येक संधीचं मी सोनं करत आहे. अर्थात काहीदा यातनाही सहन कराव्या लागतात. पण, माझ्यासोबतच्या व्यक्तीमुळे मी फार आनंदात आहे’, असं म्हणत सोनालीने तिच्यासाठी वेळा वेळ काढून भेट देण्यासाठी आलेल्या सर्वजणांचे आभार मानले आहेत. अभिनेता हृतिक रोशनने टीपलेल्या या सुरेख फोटोमध्ये सोनाली बेंद्रे, गायत्री आबेरॉय आणि सुझान खान दिसत आहेत. त्यामुळे मैत्रीचं हे त्रिकुट पाहून आपल्याला आधार देणाऱ्या मित्रमंडळींचीच सर्वांना आठवण झाली असणार यात शंका नाही.

वाचा : हाय ग्रेड कॅन्सरसाठी सोनालीची ‘ही’ चूक पडली महागात

आपल्या आयुष्याकडे वेगळ्या आणि सकारात्मक दृष्टीने पाहणाऱ्या सोनालीने फोटोसोबत एक टीपही लिहिली आहे. ‘हल्ली मला तयार होण्यासाठी लागणारा वेळ खूपच कमी आहे. कारण आता केस विंचरण्याच माझा वेळ दवडत नाही’, असं तिने लिहिलं आहे. सध्याच्या घडीला सोनाली हाय ग्रेड कॅन्सरशी लढा देत असून, त्याच्याच उपचारासाठी ती परदेशात आहे. पण, सोशल मीडियाच्या माध्यमातून मात्र ती चाहत्यांच्या संपर्कात असून, आपल्या प्रकृतीविषयी त्यांनाही माहिती देत असते. गेल्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी तिच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी अशीच प्रार्थना करण्यास सुरुवात केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2018 12:31 pm

Web Title: bollywood actress sonali bendre shares a photo with her friends on the occasion of friendship day 2018
Next Stories
1 ‘या अभिनेत्री कोण?’, श्रीदेवी यांना ओळखू शकले नाही ऋषी कपूर
2 Friendship day 2018: फिल्मी जग, खरी दोस्ती…
3 Friendship Day 2018 :हम दोस्त थे, हैं, रहेंगे.. हमेशा!