25 April 2019

News Flash

VIDEO : मुलाच्या वाढदिवशी सोनालीने पोस्ट केली आठवणींची चित्रफीत

सोनालीची ही भावनिक पोस्ट पाहून तिच्या मनाची नेमकी काय अवस्था झाली असेल याचा अंदाज लावणं सहज शक्य होत आहे.

सोनाली बेंद्रे, sonali bendre

आठवणी या अशा असतात की एकदा त्या आठवल्या की एकामागोमाग एक त्या आठवतच जातात. अशा या आठवणींच्या हिंदोळ्यावर मन कधी रमून जातं काहीच कळत नाही. अभिनेत्री सोनाली बेंद्रेसुद्धा सध्या अशीच आठवणींच्या प्रवाहात वाहत गेली आहे, असं म्हणायला हरकत नाही. या साऱ्याला निमित्त आहे ते म्हणजे तिच्या मुलाचा वाढदिवस. सध्या न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरच्या उपचारासठी गेलेली अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे.

फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने सोशल मीडियावर सुरेख फोटो पोस्ट केल्यानंतर सोनालीने आता तिच्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्याच्या बालपणीच्या आठवणींनाही उजाळा दिला आहे. एका चित्रफीतीच्या माध्यमातून तिने हा प्रवास उलगडला असून, त्यासोबत सुरेख असं कॅप्शनही दिलं आहे. एका आईसाठी तिचं मुलच सर्वकाही असतं. त्याचप्रमाणे या भावनेला शब्दबद्ध करत सोनालीने रणवीरला म्हणजेच तिच्या मुलाला १३ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यासोबतच या वाढदिवसाच्या निमित्ताने असं पहिल्यांदाच होतंय ज्यावेळी आपण मुलासोबत नाहीये, याची खंतही तिने व्यक्त केली आहे.

वाचा : हाय ग्रेड कॅन्सरसाठी सोनालीची ‘ही’ चूक पडली महागात

सोनालीची ही भावनिक पोस्ट पाहून तिच्या मनाची नेमकी काय अवस्था झाली असेल याचा अंदाज लावणं सहज शक्य होत आहे. दरम्यान, सोनालीच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याची माहिती काही दिवसांपूर्वीच तिच्या पतीने दिली होती. ज्यामुळे चाहत्यांमध्ये काहीसा आनंद पाहायला मिळाला होता. सध्या अनेकजण तिच्या प्रकृतीविषयीच चिंता व्यग्र करत असून लवकरात लवकर तिची प्रकृती ठिक होऊन मायदेशी परतावी अशीच कामना करत आहेत.

First Published on August 11, 2018 12:42 pm

Web Title: bollywood actress sonali bendre wishes son ranveer on his birthday in an emotional post