अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा प्रियकर आनंद अहुजा एप्रिल महिन्यात विवाहबंधनात अडकणार अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्याचं पाहायला मिळालं होतं. डेस्टिनेशन वेडिंगच्या थाटात सोनम आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार असल्याचं म्हटलं जात होतं. आता त्याविषयीचीच आणखी माहिती समोर आली आहे. परदेशात जाऊन लग्नगाठ बांधणाऱ्यांच्या यादीत सोनमच्याही नावाचा समावेश होणार आहे. कारण ११ आणि १२ मे दरम्यान, ती आणि आनंद दिमाखदार सोहळ्यात सहजीवनाची शपथ घेतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘मुंबई मिरर’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार दोन दिवसांच्या कार्यक्रमात स्वित्झर्लंडमध्ये सोनमचा विवासोहळा रंगणार आहे. या विवाहसोहळ्यात पाहुण्यांना आमंत्रण देण्याची सर्व जबाबदारी खुद्द अनिल कपूर यांनी आपल्या खांद्यावर घेतल्याचं कळत आहे. संगीत, मेंदीचा कार्यक्रम आणि पारंपरिक पद्धतीने सर्व विधी पार पाडत तिच्या विवाहसोहळ्याची रंगत वाढणार असल्याचं कळत आहे.

वाचा : राधिका आपटेला का करावा लागला फोन सेक्स?

जवळच्या मित्रमंडळींसाठी ‘फॅशनिस्टा’ सोनम आणि आनंद साखरपुड्याच्या छोटेखानी कार्यक्रमाचंही आयोजन करण्याच्या विचारात आहेत. जवळपास तीन महिने लग्नासाठीच्या ठिकाणाचा शोध घेतल्यानंतर अखेर जिनिव्हामध्ये येऊन कपूर कुटुंबियांची ही शोधमोहिम येऊन थांबली आहे, असं म्हणायला हरकत नाही. या ‘बिग फॅट वेडिंग’साठी सोनम तिच्या आवडीच्या म्हणजेच अबू जानी आणि संदीप खोसला या डिझायनरना पसंती देइल असं म्हटलं जात आहे. तेव्हा आता तिच्या लग्नसोहळ्याची धूम येत्या काळात अनेकांचे डोळे दिपवणार असंच म्हणावं लागेल.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actress sonam kapoor and her bae anand ahuja destination wedding will be organised in geneva
First published on: 24-03-2018 at 13:25 IST