24 November 2017

News Flash

सोनम- आनंदच्या नात्यात इंटरनेटचा अडथळा

विविध कौटुंबिक कार्यक्रमांमध्येसुद्धा सोनम आणि आनंद एकत्रच हजेरी लावतात.

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: September 14, 2017 2:20 PM

सोनम कपूर, आनंद अहूजा

बी- टाऊनची फॅशनिस्टा म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोनम कपूर गेल्या बऱ्याच दिवसांपासून आनंद अहूजाला डेट करतेय. सोनम आणि आनंदचं रिलेशनशिप सर्वांनाच ठाऊक झालं असून, ते दोघंही ही बाब कोणापासून लपवण्याचा प्रयत्न करत नाहीयेत. काही दिवसांपूर्वीच या दोघांनीही एकत्र सुट्टीचा आनंद घेतला. पण आता मात्र काही कामानिमित्त त्यांना एकमेकांपासून दूर जावं लागलं आहे. त्यामुळे आता या ‘लाँग डिस्टन्स रिलेशनशिप’मध्ये त्यांनी इंटरनेटची मदत घेत ‘स्काईप’द्वारे संवाद साधण्याची शक्कल लढवली.

तंत्रज्ञानामुळे आज जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असलेल्या व्यक्तीसोबत सहज संपर्क साधता येणं शक्य झालंय. पण, सोनमला त्यातही अडथळा येतोय. ते म्हणतात ना, ‘ये इश्क नहीं आसान…’ हे अगदी खरं असल्याचा प्रत्ययच जणू सोनमला सध्या येतोय. कारण, आनंदसोबत ‘स्काईप’वरुन गप्पा मारताना स्लो इंटरनेटच्या कारणामुळे तिला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतोय. हे कोणी दुसऱ्याने नाही तर खुद्द सोनमनेच एका व्हिडिओतून सांगितलंय.

#️⃣1️⃣ … 💫

A post shared by anand ahuja (@anandahuja) on

वाचा : अक्षयसोबत प्रियांकाचं नाव जोडताच ट्विंकलचा राग अनावर

सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये सोनम आनंदला विचारतेय की, ‘तू इतका दमलेला का दिसत आहेस?’ त्यावर आनंदचं भलतंच उत्तर येतंय. ‘तू मला दिसतच नाहीयेस’, असं तो तिला म्हणतोय. दरदिवशी स्लो इंटरनेटच्या कारणामुळे अनेक ‘लाँग डिस्टन्स कपल्स’ना ज्या अडचणींचा सामना करावा लागतोय, अगदी त्याच प्रकारच्या अडचणीला सोनमलाही सामोरं जावं लागल्याचं पाहायला मिळतंय.
सोनम कपूर गेल्या बऱ्याच दिवसांपासून कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली नसली, तरीही सध्या ती बहिण रियासोबत चालवत असलेल्या ‘क्लोथिंग ब्रॅण्ड’च्या कामात पूर्ण लक्ष देतेय. त्यासोबतच आनंदसोबतही ती जास्तीत जास्त वेळ व्यतीत करण्याला प्राधान्य देतेय. ‘भाने’ या फॅशन ब्रॅण्डचा आनंद मालक आहे. सहसा त्याचे परदेश दौरे सुरुच असतात. आता त्याला या दौऱ्यांमध्ये साथ देतेय ती म्हणते ‘खुबसूरत गर्ल’ सोनम कपूर. विविध कौटुंबिक कार्यक्रमांमध्येसुद्धा सोनम आणि आनंद एकत्रच हजेरी लावत आहेत. त्यामुळे आता त्यांच्या या रिलेशनशिपचं रुपांतर लग्नात कधी होणार, हाच एकच प्रश्न चाहत्यांच्या मनात घर करतोय.

First Published on September 14, 2017 1:33 pm

Web Title: bollywood actress sonam kapoor and her bae anand ahujas internet conversation is every long distance couples story