25 February 2021

News Flash

VIDEO : ‘रणबीर वी लव्ह यू’ म्हणताच सोनमने का दिली अशी प्रतिक्रिया?

चित्रपटांच्या प्रिमियरपर्यंत सर्वच ठिकाणी रणबीरला त्याच्या काही अफलातून चाहत्यांना भेटण्याची संधी मिळते, पण...

रणबीर कपूर, सोनम कपूर

अभिनेता रणबीर कपूरच्या चाहत्यांविषयी सांगावं आणि लिहावं तितकं कमीच आहे. विविध कार्यक्रमांपासून ते एखाद्या चित्रपटांच्या प्रिमियरपर्यंत सर्वच ठिकाणी रणबीरला त्याच्या काही अफलातून चाहत्यांना भेटण्याची संधी मिळते. अशीच संधी त्याला ‘संजू’च्या ट्रेलर लाँच सोहळ्याच्या वेळीही मिळाली. पण, त्याला मिळणारं चाहत्यांचं प्रेम अभिनेत्री सोनम कपूरला काही रुचलेलं नाही, हे तिच्या चेहऱ्यावरील भाव पाहून लगेचच लक्षात येत आहे.

राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘संजू’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला. यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ‘संजू’च्या स्टारकास्टनेही हजेरी लावली होती. ज्यांनी विविध शहरांतील चाहत्यांशीही संवाद साधला. पण, या साऱ्यामध्ये रणबीरला मिळणारं चाहत्यांचं प्रेम पुन्हा एकदा मान्यवरांनाही थक्क करुन गेलं. चाहते आणि माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरं देत असतानाच ‘रणबीर, वी लव्ह यू’, असं काहीजण जोरात ओरडले. त्यावेळी चाहत्यांना उत्तर देत रणबीरही ‘आय लव्ह यू टू’, असं म्हणाला. चाहत्यांसोबत तो ज्यावेळी संवाद साधत होता तेव्हा माध्यमांच्या कॅमेऱ्याने सोनम कपूरच्या चेहऱ्यावरील भाव टीपले. ज्यामध्ये तिने डोळ्यांच्या सहाय्याने हे जे काही चाललं आहे ते आपल्याला आवडलं नसल्याचंच जणू सांगितलं. पण, सोनम नेमकं असं का करेल, हाच प्रश्न आता रणबीरच्या चाहत्यांच्या मनात घर करु लागला आहे.

वाचा : मेसेंजरपासून सुरु झालेल्या रिलेशनशिपमध्ये बॉलिवूड अभिनेत्रीला गवसलं तिचं अस्तित्वं

सोनम आणि रणबीर ‘संजू’च्या निमित्ताने स्क्रीन शेअर करत असले तरीही त्यांच्या नात्यात असणारा संकोचलेपणा अद्यापही कायम असल्याचं या ट्रेलर लाँच सोहळ्याच्या वेळी बऱ्याचदा पाहायला मिळालं. झाल्या गोष्टींना विसरत सेलिब्रिटी अनेकदा त्यांच्या करिअरवर लक्ष केंद्रीत करतात. तेव्हा आता सोनम आणि रणबीरही त्याच वाटेवर चालणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2018 11:25 am

Web Title: bollywood actress sonam kapoor couldnt resist rolling her eyes when fans screamed we love you ranbir kapoor watch video sanju trailer
Next Stories
1 जान्हवीला पहिल्यांदाच ऑनस्क्रीन पाहून श्रीदेवी म्हणाल्या होत्या…
2 ..म्हणून मेगन आणि प्रिन्स हॅरी लग्नात आलेल्या कोट्यवधी किंमतीच्या भेटवस्तू करणार परत
3 सोशल मीडियावरील सर्व पोस्ट केले डिलीट; सुशांतला नेमकं झालंय तरी काय?
Just Now!
X