25 February 2021

News Flash

PHOTOS : श्रीदेवी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी चेन्नईत सेलिब्रिटींची रीघ

चिरतरुण अभिनेत्रीला वाहिली श्रद्धांजली

छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

बॉलिवूडची ‘चांदनी’ म्हणजेच अभिनेत्री श्रीदेवी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी नुकतेच एका शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. चेन्नई येथे आयोजित केलेल्या या शोकसभेमध्ये दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलाकार मंडळींपासून राजकीय नेतेमंडळींनीही हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. या शोकसभेमध्ये श्रीदेवी यांचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही श्रीदेवी यांचे मोलाचे योगदान होते. त्यामुळे या कलाविश्वातूनही त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याकरता अभिनेता सूर्या, त्याची पत्नी ज्योतिका आणि सूर्याच्या इतर कुटुंबियांनी हजेरी लावल्याचे पाहण्यात आले. त्याशिवाय संगीतकार ए.आर.रहमान, चित्रपट निर्माते के.भाग्यराज, प्रभुदेवा, लता रजनीकांत, मीना, राधिका, सुहासिनी मणिरत्नम, अरुण विजय, दिग्दर्शक के.एस.रवीकुमार यांनी हजेरी लावली होती.

सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रासुद्धा यावेळी उपस्थित होता. श्रीदेवी यांच्या कुटुंबासोबत मनिषचे घनिष्ट नातेसंबंध असल्यामुळे या दु:खाच्या प्रसंगी त्याने सर्वांनाच मोठा आधार दिल्याचे पाहायला मिळाले होते. यावेळी अतिशय भावुक वातावरणात श्रीदेवी यांच्या आठवणी जागवत उपस्थितांनी या चिरतरुण अभिनेत्रीला श्रद्धांजली वाहिली.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2018 3:07 pm

Web Title: bollywood actress sridevi chennai prayer meet suriya jyothika ar rahman and other tamil stars condole with boney kapoor jahnvi and khushi see photos
Next Stories
1 October Movie Trailer: अव्यक्त प्रेमाचा अनुभव म्हणजे ‘ऑक्टोबर’
2 Kisan Long March: रितेशनेही दिला ‘जय किसान’चा नारा, ट्विट करत म्हणाला…
3 राजकारण बाजूला सारून शेतकऱ्यांच्या शांततापूर्ण मोर्चाला साथ देऊया- हुमा कुरेशी
Just Now!
X