News Flash

PHOTOS : बाबांसोबत अशी रमली सनीची चिमुकली निशा

निशा आता सनी आणि डॅनियलसोबत चांगलीच रुळली आहे.

डॅनियल, निशा कौर वेबर

अभिनेत्री सनी लिओनी आणि तिचा पती डॅनियलने काही दिवसांपूर्वीच एका मुलीला दत्तक घेऊन तिचं पालकत्व स्वीकारलं होतं. निशा कौर वेबर असं नाव असणाऱ्या या मुलीचं संगोपन करण्यात सध्या सनी आणि डॅनियल चांगलेच रुळले आहेत. निशाला मराठीशिवाय इंग्रजी किंवा हिंदी भाषा येत नाही. तर सनी आणि डेनियलला मराठी येत नाही. त्यामुळे सुरुवातीला निशासोबत संवाद साधण्यात त्यांना काही अडचणी येत असल्याचं समजलं जात होतं. पण, आता मात्र त्यांच्या या सर्व अडचणी हळूहळू दूर होताना दिसत आहेत असंच म्हणावं लागेल. नुकत्याच समोर आलेल्या निशा आणि डॅनियलच्या फोटोंमधून हे सिद्ध होतंय.

या फोटोंमध्ये चिमुकली निशा डॅनियलसोबत खेळताना दिसतेय. बाबांसोबत ती आऊटींगला निघालीये. निशासोबत डॅनियलसुद्धा लहान होऊन खेळू लागलाय, संवाद साधण्याचा प्रयत्न करू लागलाय. त्यामुळे निशा आता चांगलीच रुळली आहे असं म्हणायला हरकत नाही. रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर निशाने आपल्या कुटुंबियांसाठी भेटकार्ड रंगवलं होतं. ही अनोखी भेट तिने आपल्या नव्या कुटुंबियांना देऊ केली होती. सोशल मीडियावर सनीच्या कुटुंबियांच्या या खास क्षणांचे फोटो व्हायरल झाले होते आणि त्यामध्ये डॅनिअलच्या चेहऱ्यावरही बराच आनंद पाहायला मिळत होता.

PHOTO : प्रिती आणि ऐश्वर्याच्या मैत्रीचा असा अंदाज पाहिलात का?

सनीने लातूरमधून निशाला दत्तक घेतल्यापासूनच अनेकांनीच तिच्या आणि डॅनिअलच्या या निर्णयाची प्रशंसा केली. मुख्य म्हणजे तिने या मुलीला दत्तक घेण्यापूर्वी जवळपास ११ पालकांनी तिला स्वीकारण्यास नकार दिला होता. पण, सनीने या चिमुकलीला पाहताच तिला आपलंसं करण्याचा निर्णय घेत कुटुंबाचा त्रिकोण पूर्ण केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2017 7:37 pm

Web Title: bollywood actress sunny leone daughter nisha spending time with daddy daniel weber
Next Stories
1 संजय दत्तसाठी सनी लिओनीने केला नागिन डान्स
2 PHOTO : प्रिती आणि ऐश्वर्याच्या मैत्रीचा असा अंदाज पाहिलात का?
3 ‘टॉयलेट- एक प्रेम कथा’साठी अक्षय- रणवीरने केला ‘चीप डान्स’
Just Now!
X