05 March 2021

News Flash

११ पालकांनी नाकारलेल्या निशाला सनीने स्वीकारलं

'सनीने तिच्या रंगाला महत्त्वं दिलं नाही'

सनी लिओनी आणि पती डेनिअल निशासह

बॉलिवूडच्या बेबी डॉलने म्हणजेच सनी लिओनीने काही दिवसांपूर्वीच एका मुलीला दत्तक घेतलं. महाराष्ट्रातील लातूरमधून सनीने या मुलीला दत्तक घेतलं. सनीने या मुलीला दत्तक घेण्याआधी ११ पालकांनी तिला नाकारलं होतं. सहसा मुलं दत्तक घेताना पालक त्यांचं आरोग्य, रंग या गोष्टींना जास्त प्राधान्य देतात. पण, सनीने मात्र तसं काही केलं नाही. बेबी डॉल सनी आणि तिच्या पतीने रंग- रुप न पाहता निशाला दत्तक घेतलं.

‘त्या मुलीचा रंग न पाहता, तिच्या कुटुंबियांची माहिती न जाणून घेता आणि तिच्या आरोग्याविषयीही फार विचारपूस न करता सनीने तिला दत्तक घेतलं. त्यांनी कोणत्याच नियमांचं उल्लंघन न करता मुलगी दत्तक घेण्यासाठी प्रतिक्षा केली’, असं ‘चाइल्ड अडॉप्शन रिसोर्स एजन्सी (CARA)’चे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार ‘पीटीआय’ला दिलेल्या माहितीत म्हणाले.

वाचा : .. म्हणून शाहरुखच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांना एकही पैसा मिळणार नाही

‘सीएआरए’च्या संकेतस्थळावरुन सनीने गेल्या वर्षी मूल दत्तक घेण्यासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर सर्व प्रक्रिया झाली आणि सनीने निशाला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. सर्व कागदोपत्री व्यवहार झाल्यानंतर लातूरमधून तिने या गोंडस मुलीचं पालकत्व स्वीकारलं. दरम्यान, सध्या सनीची ही मुलगी अनेकांचं लक्ष वेधत आहे. अनेकांनी तिचे फोटो पाहण्याची उत्सुकताही व्यक्त केली आहे. सनीची लेक निशा लातूरची असल्यामुळे तिला मराठीत बोललेलं थोडंफार कळतं. पण, सनी आणि डॅनिअलला मात्र मराठी येत नसल्यामुळे तिच्याशी संवाद कसा साधायचा हा सर्वात मोठा प्रश्न त्यांच्यासमोर येत असल्याचं म्हटलं जात होतं. पण, आता मात्र ती हळूहळू इंग्रजी शिकायला लागली असल्याचंही म्हटलं जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2017 7:27 pm

Web Title: bollywood actress sunny leone happily adopted daughter nisha kaur weber without looking at colour background and health status
टॅग : Sunny Leone
Next Stories
1 …म्हणून ऐश्वर्याने नव्या नवेलीसोबत रेड कार्पेटवर येणं टाळलं
2 दिशा पटानीचे नवे फोटोशूट पाहिले का?
3 अखेर नैराश्यावर बोलला कपिल शर्मा
Just Now!
X