अभिनेत्री सुष्मिता सेन पुन्हा एकदा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वीच सुष्मिता आणि तिचा प्रियकर रितिक भसिन यांचे ब्रेकअप झाल्याचे वृत्त समोर आले होते. रितिक, सुष्मिताचा दहावा प्रियकर असल्याचेही म्हटले जात होते. त्याच्यासोबत ती गेल्या चार वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होती. पण, काही कारणास्तव प्रेमात तिला पुन्हा एकदा अपयशाचा सामना करावा लागला होता. झहीर खान आणि सागरिका घाटगे यांच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये मात्र ब्रेकअपचा लवलेशही तिच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला नाही.

‘स्पॉटबॉयई’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तामुसार सुष्मिता त्या पार्टीत एकटीच आली नव्हती, तर तिला एका खास व्यक्तीची साथ लाभली होती. ती खास व्यक्ती म्हणजे रितिक भसिन. एकमेकांसोबतच असलेले सुष्मिता आणि रितिक पार्टीचा मनमुराद आनंद तर घेत होते. शिवाय ‘डान्स फ्लोअर’वरही त्यांनी धमाल केल्याचे अनेकांनी पाहिले. त्या पार्टीत येत्या काळात त्यांनीसुद्धा लग्न करावे असा सल्ला तेथे उपस्थित काही मित्रमंडळींनी दिल्याचेही म्हटले जात आहे. तेव्हा आता त्यांच्या नात्याविषयी नेमकी कोणती गोष्ट खरी हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करतोय.

वाचा : पिसाळलेल्या कुत्र्यांना मारायलाच पाहिजे: शरद पोंक्षे

https://www.instagram.com/p/BcCm6QsHviR/

https://www.instagram.com/p/BcE16paHD9g/

https://www.instagram.com/p/BcCwgAgnyxX/

सुष्मिताच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तिने या रिसेप्शनमधील काही फोटो पोस्ट केले. पण, त्यात कुठेही रितिकची झलकही दिसली नाही. शिवाय त्या रिसेप्शनच्या वेळी रितिक माध्यमांच्या नजरेतही आला नाही. त्यामुळे आता त्यांच्याविषयीच्या बऱ्याच चर्चा रंगत आहेत. झहीर-सागरिकाच्या रिसेप्शनमध्ये सुष्मिता फारच सुंदर दिसत होती. कलाकारांची मांदियाळी असलेल्या त्या पार्टीत या माजी मिस युनिव्हर्सवरच अनेकांच्या नजरा खिळल्या होत्या. खुद्द क्रिकेटर श्रेयस अय्यरही तिच्या सौंदर्यावर भाळला असून, त्यानेही तिच्यासोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता.

https://www.instagram.com/p/BcCbkX1nQ7b/