इंटरनेट आणि सोशल मीडियाचे प्रस्थ बरेच वाढले असल्यामुळे प्रत्येकाच्या तोंडी याविषयीच्याच चर्चा पाहायला मिळत आहेत. कारण इंटरनेटमुळे गोष्टी जितक्या सोप्या आणि सुकर झाल्या आहेत तितकेच काही बाबतीत तेढही निर्माण झाली आहे. मुख्य म्हणजे सोशल मीडियाचा सर्वाधिक फायदा कलाविश्वाला झाल्याचे म्हटले जाते. पण, काही गोष्टी मात्र याला अपवाद ठरतात. याचा प्रत्यय नुकताच अभिनेत्री सुश्मिता सेनला आला आहे.

सुश्मिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केलेल्या फोटोवर बऱ्याचजणांनी कमेंट केल्या असून, एका युजरने तर तिला लग्नाची मागणी घातली आहे. आपल्या फिटनेससाठी ओळखली जाणारी अभिनेत्री सुश्मिता सेन नेहमीच इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर करत असते. यावेळी तिने व्यायाम केल्यानंतरचा एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये तिचे अॅब्स स्पष्टपणे दिसत असून, व्यायाम आणि संतुलित आहाराचा तिच्या शरीरावर झालेला परिणाम पाहायला मिळत आहे. सुश्मिताने हा फोटो पोस्ट करत त्यासोबत एक मोठे कॅप्शनही लिहिले. त्यासोबतच #celebratelife #celebrateyourself असे हॅशटॅग देत सुश्मिताने हा फोटो पोस्ट केला.

तिने फोटो पोस्ट केल्यानंतर अनेकांनीच तो लाइक केला. काहींनी त्यावर कमेंटही केल्या. कोणत्याही सेलिब्रिटीच्या फोटोंवर येणाऱ्या कमेंट नेहमीच नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. असेच सुश्मिताच्या बाबतीतही घडले. अनेकांनी तिने हा नेमका कसा फोटो पोस्ट केलाय, असे म्हणत तिला ट्रोल केले. तर एका युजरने थेट सुश्मिताला लग्नाची मागणी घातली. काही युजर्सनी तिची प्रशंसा करत तूच आमचा आदर्श आहेस असेही म्हटले. तेव्हा आता या लग्नाच्या मागणी घालणाऱ्या युजरला सुश्मिता काय उत्तर देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. मुळात त्याचं हे प्रपोजल तिच्यापर्यंत पोहोचणार की नाही हासुद्धा एक मोठा प्रश्नच आहे.

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’