23 April 2018

News Flash

मुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर

देवाने तुम्हाला चांगलं डोकं दिलंय, ज्यात तुम्ही घृणेची भावना भरलीये आणि हे तोंड दिलंय त्यातूनही अशा घाणेरड्या गोष्टी करताय.

करिना कपूर, स्वरा भास्कर

एकिकडे आपली मतं मांडण्यासाठी म्हणून मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या सोशल मीडियाचं जाळं दिवसेंदिवस जास्तच पसरताना दिसत आहे. पण, त्यासोबतच सोशल मीडिया ट्रोलिंगचं प्रमाणही लक्षणीयरित्या वाढत आहे. सेलिब्रिटी आणि काही प्रसिद्ध चेहऱ्यांनी या माध्यमातून काही महत्त्वाच्या मुद्द्यावर मतप्रदर्शन केल्यानंतर ट्रोलर्स त्यांची खिल्ली उडवण्यास सुरुवात करतात. आता मात्र हे चित्र बदलताना दिसत आहे. सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगला आळा घालण्यासाठी खुद्द सेलिब्रिटींनीच आता काही महत्त्वाची पावलं उचलल्याचं पाहायला मिळतंय. काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या कठुआ बलात्कार प्रकरणी बॉलिवूड सेलिब्रिटींनीसुद्धा त्यांची मतं मांडल्याचं पाहायला मिळालं.

#justiceforourchild आणि #kathua असे हॅशटॅग लावत सोनम कपूर, स्वरा भास्कर, करिना कपूर आणि अशा बऱ्याच सेलिब्रिटींनी बलात्काराविरोधात आवाज उचलला. सोशल मीडियावर यासंबंधीचे फोटोही पोस्ट केले. यातच एका युजरने करिना कपूरच्या खासगी आयुष्यावर निशाणा साधत एक हिंदू असूनही तिने मुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्याचं म्हणत तिला याची लाज वाटली पाहिजे, अशा आशयाची प्रतिक्रिया दिली. त्याशिवाय करिनाने तिच्या मुलाचं नाव एका क्रूर सुलतानाच्या नावावरुन ठेवल्यामुळेही तिच्यावर निशाणा साधला गेला.

वाचा : बलात्कार करणाऱ्यांना जगण्याचा हक्क नाही; रेणुका शहाणे यांची जळजळीत पोस्ट

एका महत्त्वाच्या मुद्दयाविषयी मतप्रदर्शन करणाऱ्या करिनाला अशा प्रकारे ट्रोल केलं गेल्याचं पाहून अभिनेत्री स्वरा भास्करने तिच्या वतीने त्या युजरला चांगलच खडसावलं. ‘तुम्हाला तुमच्या अस्तित्वाचीसुद्धा लाज वाटली पाहिजे. देवाने तुम्हाला चांगलं डोकं दिलंय, ज्यात तुम्ही घृणेची भावना भरलीये आणि हे तोंड दिलंय त्यातूनही अशा घाणेरड्या गोष्टी करताय. तुम्ही भारत देशावर आणि हिंदूंवर लागलेला काळीमा आहात. अशा घाणेरड्या गोष्टी करण्यासाठी तुमचं धाडस होतंच कसं, हे धाडस सरकारकडून तर तुम्हाला मिळालं नाहीये ना?’, असं ट्विट करत स्वराने संताप व्यक्त केला. तिच्या या ट्विटमधून सोशल मीडियावर विनाकारण कोणत्याही विषयाला चालना देणाऱ्या त्या ट्रोलरचा चांगलच उत्तर मिळालं असं म्हणायला हरकत नाही.

First Published on April 16, 2018 12:58 pm

Web Title: bollywood actress swara bhaskar slams troll who was commenting on kareena kapoor on kathua gang rape matter
 1. Ganesh Gade
  Apr 20, 2018 at 4:03 pm
  ह्या दोन टाक्या च्या बायका पैशासाठी नग्न होऊन अंगप्रदर्शन करणारी आणि बेड सिन देणारी हि घाणेरडी जमात लोकांच्या मना मध्ये वासना उत्पन्न होईल असे नग्न सिन देऊन पैसे कमव नाऱ्या ने जास्त शहाणं पण शिकवू नये बलात्कार करणारा नराधम कोणी हि असो त्याचे तुकडे तुकडे करा
  Reply
  1. Jitendra More
   Apr 16, 2018 at 2:09 pm
   २० वर्षांनी मोठ्या अमृता सिंग शी सैफ अली ने लग्न केले. दोन मुले झाली आणि हे दोघे वेगळे झाले. नंतर १० वर्षांनी लहान करिनाशी लग्न केले. हे काय समाजाचे आदर्श आहे. तैमूर काय करतो , तो काय खातो याची फालतू चर्चा प्रसार माध्यमे करतात. या देशात कुपोषणामुळे लहान मुले मृत्यू पावतात आणि यांना तैमूरचे पडले आहे. करीनाला काळात नव्हते कि सैफ अली खान अमृता सिंगशी व्यवस्थित वागला नाही अशा SECOND HAND व्यक्तीशी लग्न कसे करावे. कि फक्त त्याची संपत्ती पाहून लग्न केले.
   Reply