News Flash

हॉलिवूडपटात माँ आनंद शीला यांची भूमिका साकारणार ‘ही’ बॉलिवूड अभिनेत्री

या अभिनेत्रीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.

२०१८ या वर्षात अमेरिकन गायक निक जोनाससोबत लग्नगाठ बांधलेल्या अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिचा मोर्चा आता कामाकडे वळविला आहे. बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणाऱ्या प्रियांकाने काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील लोकप्रिय टॉक शो द एलन डिजेनेरसमध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमामध्ये तिने तिच्या आगामी प्रोजेक्टविषयी खुलासा केला असून तिच्या पदरामध्ये आणखी एक हॉलिवूडपट पडल्याचं समोर आलं आहे.

प्रियांकाचा आगामी हॉलिवूड चित्रपट ‘इजन्ट इट रोमॅन्टिक’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तिने या शोमध्ये हजेरी लावली. या कार्यक्रमामध्ये प्रियांकाने तिच्या चित्रपटाचं जोरदार प्रदर्शन केल्याचं पाहायला मिळालं. त्यासोबतच ती लवकरच माँ आनंद शीला यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात झळकणार असल्याचा खुलासा तिने केला. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनीदेखील या विषयी ट्विट करुन माहिती दिली आहे.

बेरी लेविन्सन यांच्या एका प्रोजेक्टवर मी सध्या काम करत असून हा चित्रपट माँ आनंद शीला यांच्या जीवनावर आधारित आहे. माँ शीला या आध्यात्मिक गुरु रजनीश ओशो यांच्या जवळच्या सहकारी म्हणून प्रसिद्ध होत्या. माँ आनंद शीला यांची अमेरिकेत प्रचंड लोकप्रियता असून मी त्यांची भूमिका साकारणार आहे, असं प्रियांकाने सांगितलं.

माँ आनंद शीला यांचा १९४९मध्ये बडोद्यात जन्म झाला होता. त्यांचे वडील अंबासास पटेल हे ओशोंचे शिष्य होते. त्यामुळे ओशो यांचा माँ आनंद शीला यांच्या घरी चांगला वावर होता. त्यांच्या प्रतिभावंत व्यक्तीमत्वामुळे मी प्रभावीत झाले आणि सन्यास घेतला, असं माँ आनंद शीला यांनी एका पुस्तकात लिहीलं आहे.

दरम्यान, अध्यात्मिक गुरु ओशो यांच्या आश्रमात ५५ मिलियन डॉलरचा घोटाळा केल्याप्रकरणी मा शीला यांना ३९ महिने तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. त्यानंतर २० वर्षांनी शीला यांनी ‘डोंट किल हिम! ए मेम्वर बाई मा आनंद शीला’ या पुस्तकात ओशो आश्रम आणि त्यासंदर्भात अनेक रहस्यांवरुन पडदा उठवला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2019 2:04 pm

Web Title: bollywood actress to play ma anand sheela in her next hollywood project
Next Stories
1 विराट व अनुष्कामध्ये आहेत ही साम्यस्थळं!
2 Koffee With Karan 6 : सिद्धार्थ मल्होत्राला करायचंय करिनाशी लग्न
3 ‘उरी’ने ओलांडला २०० कोटींचा टप्पा, उपराष्ट्रपतींनाही आवडला सिनेमा; ट्विट करुन म्हणाले…
Just Now!
X