भारताविरोधात विरोधात वादग्रस्त वक्तव्य करून गरळ ओकणारी पाकिस्तानी अॅक्ट्रेस वीणा मलिक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळेस वीणाने भारतीय हवाई दलातील विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्यासंदर्भात वादग्रस्त ट्विट केले आहे. तिच्या या ट्विटवरुन भारतीयांनी तिला चांगलेच झापले आहे. वीणाने अभिनंदन यांचे दोन फोटो ट्विट केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये अभिनंदन विमानाच्या बाजूला उभे असताना दिसत आहेत तर दुसऱ्या फोटोमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या जवानांनी अभिनंदनला पकडल्याचे दिसत आहे.

हे दोन्ही फोटो ट्विट करताना वीणाने अभिनंदन यांच्या फोटोंच्या माध्यमातून पाकिस्तानी हवाईदलाचे गुणगाण गायले आहेत. “फोटोस सारं काही सांगतोय. आधी आणि नंतर. अशी परिस्थिती करुन ठेवते पाकिस्तानी हवाईदल,” असं कॅप्शन वीणाने या फोटोला दिले आहे.

फेब्रुवारी महिन्यात पुलवामा हल्ल्यानंतर १२ दिवसांनी म्हणजेच २६ फेब्रुवारी रोजी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथे एअर स्ट्राइक करत जैश-ए-मोहम्मदची प्रशिक्षण केंद्रं उद्ध्वस्त केली. त्यानंतर भारताच्या हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी लाडऊ विमानांना पळवून लावताना २७ फेब्रुवारीच्या सकाळी आकाशात जो संघर्ष (डॉगफाइट) झाला त्यामध्ये वर्थमान यांनी पाकिस्तानचे अत्याधुनिक एफ १६ फायटर विमान पाडले होते. यावेळी अभिनंदन यांनी मिग २१ बायसन विमानातून पाकिस्तानच्या एफ १६ फायटर विमानावर वर आर- ७३ मिसाइल डागले. या झटापटीमध्ये पाकिस्तानी विमानांनी डागलेले अॅमराम मिसाइल वर्थमान यांच्या मिग २१ बायसन विमानाला धडकले. अभिनंदन यांचे मिग-२१ पाकव्याप्त काश्मीरमध्ये पडले. त्यामुळे अभिनंदन पॅराशूटच्या सहाय्याने खाली उतरताना पाकिस्तानी सैन्याच्या हाती लागले. भारताने चहूबाजूंनी पाकिस्तानवर राजनैतिक दबाव आणल्यानंतर दोन दिवसांनी पाकिस्तानने अभिनंदन यांना भारताकडे सोपवले. या शौर्यासाठी स्वातंत्र्यदिनी (१५ ऑगस्ट) अभिनंदन यांना वीरचक्र पदक प्रदान करण्यात आले. वर्थमान यांनी वैद्यकीय चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या असून लवकरच ते विमान उडवताना दिसतील.

पाकिस्तानी हवाईदलाला धूळ चारणाऱ्या अभिनंदन यांना वीरचक्र प्रदान केल्याने पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला आहे. आधीच कलम ३७० रद्द केल्यामुळे पाकिस्तानचा तिळपापड झालेला असताना अभिनंदन यांना मिळालेला वीरचक्र पुरस्कारही पाकिस्तानला चांगलाच झोंबल्याचे दिसत आहे. म्हणूनच वीणा मलिकेला अचानाक अभिनंदन यांची आठवण झाल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले आहे. अनेकांनी वीणाला या ट्विटखाली चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.

खरयं हा फोटो बरंच काही सांगून जातो..

तुला अभिमान कसला सेल्फी काढल्याचा?

तू सांगितलेली कथा अर्धीच हा होता क्लायमेक्स

जरा तुमच्या पंतप्रधानांकडे पाहा

आधी आणि नंतर…

संपवला

शस्त्र नसताना त्याला पकडायला तीन जण लागले

तुलना

पाकिस्तानी लष्करी अधिकारी युद्धाच्या आधी आणि नंतर

जा के देख रेकॉर्ड मे

भीक मागता येते तर कमावायचं कशाला

आधी आणि नंतर

दरम्यान, भारताने कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानने भारताबरोबरचे सर्व संबंध संपुष्टात आणले असून व्यापारही पूर्णपणे बंद केला आहे. भारताच्या या निर्णयावर पाकिस्तानने जगभरातील अनेक देशांकडे मदत मागितली मात्र सर्वच देशांनी काश्मीर हा भारताचा अंतर्गत प्रश्न असल्याचे सांगत हे प्रकरण भारत आणि पाकिस्तानने सोडवावे असे मत व्यक्त केले आहे.