14 December 2017

News Flash

‘तो’ विद्यावर नव्हे, तिच्या बहिणीवर प्रेम करायचा

ते दोघंही एकमेकांना डेट करत होते

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: October 12, 2017 12:16 PM

विद्या बालन

आपल्या निखळ हास्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री विद्या बालन सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र आहे. ‘तुम्हारी सुलू’ या चित्रपटातून विद्या एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार असून, या चित्रपटात ती ‘रेडिओ जॉकी’च्या रुपात दिसेल. नुकतंच या चित्रपटाच्या निमित्ताने विद्याने अभिनेत्री नेहा धुपियाच्या लोकप्रिय ‘ऑडिओ चॅट शो’वर हजेरी लावली होती. ‘नो फिल्टर नेहा’ या चॅट शोमध्ये विद्याने तिच्या खासगी आयुष्याविषयीसुद्धा बरेच खुलासे केले. त्यापैकीच एका उलगड्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

बहिण किंवा भावासाठी आपण काहीही करु शकतो. मुळात बहिण-भावाच्या नात्यात हे ‘काहीही करणं’ कधीकधी आपल्यासाठी कठिण होऊन बसतं. कारण, अनेकदा या अलिखित अटीअंतर्गत आपल्या आवडत्या गोष्टींचा त्यागही करावा लागतो. विद्यालाही अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला होता. याचा खुलासा तिनेच नेहाच्या चॅट शोमध्ये केला. ‘तुम्हाला माहितीये का, मला कधीकधी शहीद झाल्यासारखं वाटतं. ज्यावेळी मला कळलं की तो माझ्या बहिणीवर प्रेम करतो आणि ते दोघंही एकमेकांना डेट करत आहेत तेव्हा मी विचार केला की, हा पुढे जाऊन आपल्या बहिणीचा जोडीदारही बनू शकतो. याच विचाराने माझ्या प्रेमाचा अंत झाला’, असं विद्या म्हणाली.

Tumhari Sulu will now release on the 17th NOVEMBER 💫….Yay 💃🏻🕺🏻!!

A post shared by Vidya Balan (@balanvidya) on

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

बहिणीच्या आणि ‘त्या’ मुलाच्या नात्यात न येता तिने आपल्याच प्रेमाची गळचेपी करण्याचा निर्णय घेतला होता. आता तो मुलगा नेमका होता तरी कोण ज्याच्यावर खुद्द विद्या भाळली होती, हाच प्रश्न चाहत्यांच्या मनात घर करत आहे. कारण, त्याचा उलगडा विद्याने केलाच नाही. ही भूतकाळातील गोष्ट असली तरीही विद्याला मात्र त्या घटनेचा विसर पडला नाही, हेच या चॅट शोमध्ये स्पष्ट झालं. नेहा धूपियासोबत गप्पा मारत असताना विद्याने बऱ्याच आठवणी जागवल्या होत्या. सोशल मीडियावरही तिचा सहभाग असलेल्या या चॅट शोची बरीच चर्चा होती.

First Published on October 12, 2017 12:16 pm

Web Title: bollywood actress vidya balan decided to give up her love for her sister no filter neha audio chat show