08 March 2021

News Flash

Begum Jaan Making: पडद्यामागची ‘बेगम जान’

'माझ्या शरीरावर फक्त माझाच हक्क'

छाया सौजन्य- युट्यूब

विद्या बालनची मुख्य भूमिका असणारा ‘बेगम जान’ हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये असणारा विद्याचा लूक आणि चित्रपटातील गाणी सध्या प्रेक्षकांची दाद मिळवत आहे. भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाचे कथानक आधारलेले आहे. अशा या बहुचर्चित चित्रपटाचा बिहाइंड द सीन्सचा एक व्हिडिओ नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये विद्या बालन आणि या चित्रपटातील इतर सर्वच कलाकार त्यांच्या अनुभवाविषयी सांगत आहेत.

या चित्रपटासाठी कुंटणखान्याच्या मालकिणीचे रुप घेण्यापासून ते ‘बेगम जान’ची व्यक्तिरेखा त्याच ताकदीने कॅमेरासमोर साकारणारी विद्या पाहता तिच्या अभिनयाचा आणखी एक पैलू आपल्या भेटीला येत आहे. बिहाइंड द सीन्सच्या या व्हिडिओमध्ये विद्या तिने साकारलेल्या भूमिकेविषयी सांगत असून, प्रत्येक स्त्रीमध्ये एक ‘बेगम जान’ दडलेली आहे; असेही विद्या म्हणते आहे. ‘आगामी बेगम’ जान या चित्रपटामध्ये विद्या बालनसोबतच गौहर खान (रुबिना), रिद्धीमा तिवारी (अंबा), रविजा चौहान (लता) या अभिनेत्रीही झळकणार आहे.

‘बेगम जान’चे एकंदर कथानक आणि ते मांडण्यासाठी दिग्दर्शक श्रीजित मुखर्जीने घेतलेली मेहनत पाहता सध्या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. ‘बेगम जान’ हा चित्रपट अभिनेत्री रितूपर्णा सेनगुप्ताचा बंगाली चित्रपट ‘राजकाहिनी’चे हे हिंदी व्हर्जन आहे. दरम्यान विद्याचा हा चित्रपटही सध्या सेन्सॉरच्या विळख्यात अडकला आहे. या चित्रपटातील एकूण १२ दृश्यांवर कात्री चालवण्यात आली आहे. तेव्हा आता एका भक्कम कथानकासह प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2017 7:16 pm

Web Title: bollywood actress vidya balan movie begum jaan behind the scenes video release
Next Stories
1 Video : ‘हिचकी’ चित्रपटात राणी शिक्षिकेच्या भूमिकेत दिसण्याचे संकेत
2 Begum Jaan song O Re Kaharo: हृदयस्पर्शी ‘ओ रे कहारो’ गाणे प्रदर्शित
3 ‘इंदू सरकार’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पक्की
Just Now!
X