03 March 2021

News Flash

स्थुलतेविषयी विद्या बालन म्हणतेय…

बॉडी शेमिंगच्या याच मुद्द्यावर आता अभिनेत्री विद्या बालन हिनेही आपलं मत मांडलं आहे.

विद्या बालन, vidya balan

‘फन्ने खान’ या आगामी चित्रपटातून एक महत्त्वाचा मुद्दाही प्रकाशझोतात येत आहे. म्युझिकल कॉमेडी या प्रकारात मोडणाऱ्या या चित्रपटातून अभिनेत्री पिहू संद अभिनय विश्वात पदार्पण करत आहे. या चित्रपटातून ती अनिल कपूर आणि दिव्या दत्ता यांच्या मुलीची भूमिका साकारत आहे. जिला तिच्या स्थुलतेमुळे बऱ्याच अडचणींचा, बोचऱ्या टीकांचा सामना करावा लागतो आहे. बॉडी शेमिंगच्या प्रश्नावर या चित्रपटातून प्रकाश टाकण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.

‘फन्ने खान’मध्ये मांडण्यात आलेल्या या मुद्द्याविषयी खुद्द अनिल कपूर यांनीही भाष्य करत अभिनेत्री सोनम कपूर आणि अर्जुन कपूर यांचेही बॉडी शेमिंगचे अनुभव सांगितले होते. स्थुलतेमुळे त्यांनी नेमकं कोणत्या अडचणींचा सामना केला होता, यावरुनही अनिल कपूर यांनी पडदा उचलला होता.

Bigg Boss Marathi : विजेती मेघा धाडेबद्दल जाणून घ्या ‘या’ पाच गोष्टी

बॉडी शेमिंगच्या याच मुद्द्यावर आता अभिनेत्री विद्या बालन हिनेही आपलं मत मांडलं आहे. ‘तुम्ही कुठेही जा, हल्ली अनेकजण तुमच्या शरीरयष्टीविषयी टीप्पणी करतात. मला कोणी मोटी, जाडी म्हटलं तर त्याने काही फरत पडत नाही. पण, माझ्या शरीरावर कोणी कधी काही बोललं तर मात्र मला अजिबात आवडत नाही. कारण तुमच्या बुद्धीविषयी कोणी बोलत नाही. मुळात बुद्धी ही विकली जात नाही. कोणाच्याही अस्तित्वावर मत मांडण्याचा आपल्याला हक्क नाही. मी अशा प्रसंगांचा बऱ्याचदा सामना केला आहे’, असं विद्या म्हणाली. एका चित्रपटाच्या निमित्ताने समोर आलेला हा मुद्दा आणि कलाकारांची त्याविषयी असणारी भूमिका पाहता आता या मुद्द्यावर आणखी किती चर्चा रंगणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2018 11:55 am

Web Title: bollywood actress vidya balan on body shamming sayas dont like people commenting on my body
Next Stories
1 नव्या घरासाठी टायगरने मोजलेली किंमत वाचून तुम्हालाही बसेल धक्का
2 #Gold : देश स्वतंत्र झाला, पण…
3 Kargil Vijay Diwas : जाणून घ्या, कारगिल युद्धाचं बॉलिवूडसोबतचं नातं
Just Now!
X