07 March 2021

News Flash

मुंबईतील व्यावसायिकावर झीनत अमान यांना धमकावण्याचा आरोप

चित्रपट निर्मिती क्षेत्रातही तो काही काळ सक्रिय होता असे म्हटले जातेय

झीनत अमान

ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान यांनी मुंबईस्थित एका व्य्वसायिकावर आपल्याला धकावण्याचा आणि गैरवर्तन केल्याचा आरोप करत जुहू पोलिसांत त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. सोमवारी त्यांनी याप्रकरणातील तक्रार दाखल केली. आरोपीवर भारतीय दंडसंविधानाच्या कलम ३०४ ड (पाठलाग करणे) आणि कलम ५०९ (महिलेला अपमानास्पद वागणूक देणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या काही काळापासून झीनत अमान आणि तो व्यावसायिक एकमेकांना ओळखत होते. पण, त्यानंतर काही कारणांमुळे झीनत यांनी त्याच्याशी बोलणे थांबवले. ज्यामुळे तो व्यावसायिक सतत झीनत यांच्याशी संपर्क साधण्याचा आणि त्यांचा पाठलाग प्रयत्न करत होता. आरोपीने झीनत अमान यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर अनेक अश्लील मेसेज पाठवले असून, काही दिवसांपूर्वी त्याने झीनत यांच्या घरात घुसून गैरवर्तन करत तेथे असणाऱ्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याचेही वृत्त आहे.

‘अफ्स्पा’बाबत फेरविचाराची ही वेळ नाही!

चित्रपट निर्मिती क्षेत्रातही तो काही काळ सक्रिय असल्याचे वृत्त ‘आज तक’ने प्रसिद्ध केले आहे. दरम्यान, सततच्या धमकावणाऱ्या आणि पाठलाग करणाऱ्या त्या व्यावसायिकाला ताकीद देऊनही काहीच उपयोग न झाल्यामुळे अखेर झीनत अमान यांनी पोलिसांची मदत घेण्याचा निर्णय घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2018 10:20 am

Web Title: bollywood actress zeenat aman files molestation complaint against mumbai businessman
Next Stories
1 VIDEO : ‘लल्लाटी भंडार’वर खिल्जी थिरकतो तेव्हा
2 व्यासपीठावरच या कलाकाराने घेतला अखेरचा श्वास
3 VIDEO : ‘खलीबली’ करणारा क्रूर खिल्जी पाहिला?
Just Now!
X