News Flash

आमिर खानने तब्बल १२ दिवस आंघोळ केली नाही!; कारण ऐकून म्हणाल…

आमिर आंघोळ न करण्याच्या निर्णयावर ठाम राहिला.

बॉलिवूडमधील अनेक कलाकार त्यांच्या भूमिकांसाठी मोठी मेहनत घेताना दिसतात. भूमिकेचा आभ्यास करून त्यासाठी ते स्वत: मध्ये अनेकदा बदल घडवून आणतात. यासाठी त्याने बरेच कष्ट देखील करावे लागतात. अभिनेता आमिर खान तर त्याच्या या परफेक्शनसाठीच ओळखला जातो. आमिर त्याच्या सिनेमांसाठी कायम मेहनत घेत असतो. मिस्टर परफेक्शनिस्टने तर एका सिनेमासाठी तब्बल 12 दिवस आंघोळ न केली नव्हती.

आमिर खान आणि राणी मुखर्जीचा ‘गुलाम’ सिनेमा चांगलाच गाजला होता. या सिनेमातील क्लायमेस्क सीनचं जवळपास 10 ते 12 दिवस शूटिंग सुरू होतं. या सिनमध्ये आमिर खान चांगलाच जखमी झाल्याचं दाखवण्यात आलं होतं. चेहऱ्यावरील जखमा आणि लूक मेन्टेन करण्यासाठी आमिरने चक्क 12 दिवस आंघोळ केली नव्हती. आमिरने कायम अशा प्रकारे त्याच्या कामावर श्रद्धा दाखवली आहे. याचमुळे त्याला मिस्टर परफेक्शनीस्ट असं म्हंटलं जातं.

(photo-youtube/Indian Film Action) ‘गुलाम’ सिनेमातील दृश्य

एका वृत्तानुसार आमिरला त्या काळात आंघोळ न केल्यानं आमिरची अवस्था खराब झाली होती. त्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. मात्र भूमिकेला आणि त्या क्लायमेक्स सीनला न्याय देण्यासाठी आमिर आंघोळ न करण्याच्या निर्णयावर ठाम राहिला.

विमानात प्रियांका चोप्राची कॉकटेल पार्टी, दारुच्या नशेत अखेर ती…

आमिरने त्याच्या अनेक सिनेमांसाठी आजवर मोठी मेहनत घेतली आहे. यात अलिकडचं उदाहरण घ्यायचं झालं तर ‘दंगल’ सिनेमासाठी आमिरने आधी प्रचंड वजन वाढवलं तर याच सिनेमासाठी त्याने काही दिवसातच वजन घटवून अॅब्सही तयार केले. याचसोबत ‘लगान’, ‘गजनी’, ‘पीके’ या सिनेमांसाठी त्याने मेहनत घेतली आहे. आमिर लवकरच ‘लाल सिंह चड्ढा’ या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमातही आमिर एका वेगळ्या रुपात चाहच्यांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2021 1:33 pm

Web Title: bollywood amir khan did not take bath for 12 days for movie scene he was suffering from trouble kpw 89
Next Stories
1 लारासाठी स्वतः डिझाईन केली अंगठी; अशी आहे लारा आणि महेश भूपतीची प्रेमकहाणी!
2 लाडक्या लेकासोबत हार्दिक पांड्याचे खास क्षण; अनुष्का शर्माने केली कमेंट
3 रणवीर सिंग ‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत कऱणार काम; साईन केला बिग बजेट चित्रपट
Just Now!
X