News Flash

पदार्पणातच ‘फ्लॉप शो’ देणाऱ्या या स्टारची सलमान घेणार शिकवणी?

हर्षवर्धनने सलमानप्रमाणे चित्रपट निवडावे अशी अनिल कपूरची इच्छा!

अभिनेता सलमान खान

बॉलिवूडमध्ये पन्नाशीनंतरही आपली लोकप्रियता टिकवून ठेवणाऱ्या सलमान खानने बऱ्याच कलाकारांना आपल्या क्षेत्रात स्थिर केले आहे. अभिनेत्री असो किंवा अभिनेता सलमानचा आशिर्वाद मिळाला की, तो चेहरा बॉलिवूडमध्ये लोकप्रियता मिळविण्यात यशस्वी झाला आहे. बॉलिवूडमध्ये आपल्या दबंगगिरीमुळे प्रसिद्ध असणाऱ्या सलमान नवख्या कलाकारांसाठी गुरुच असतो. हा गुरु आता बॉलिवूडमधील दिग्गज कलाकाराच्या मुलाची शिकवणी घेणार आहे. अनिल कपूर याचा मुलगा हर्षवर्धनने ‘मिर्ज्या’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. बॉलिवूडचा वारसा असतानाही त्याला या क्षेत्रात अपयश पत्करावे लागले. आपल्या मुलाच्या कारकिर्दीची सुरुवातीची झलक प्रेक्षकांना भावली नसल्याने अनिल कपूर सध्या चिंतेत आहे.

आपल्या मुलाला चित्रपट निवडण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी अनिल कपूर सद्या सलमान खानशी चर्चा करत असल्याचे वृत सूत्रांकडून मिळते आहे. हर्षवर्धन चित्रपटाची निवड करताना चुक करत असल्याचे अनिल कपूर यांचे मत आहे. मुलाने आलेख उंचावण्यासाठी चांगल्या चित्रपटाची निवड करण्यासाठी सलमानने मार्गदर्शन करावे यासाठी अनिल कपूर धडपड करताना दिसत आहेत. हर्षवर्धन लवकरच विक्रमादित्य मोटवानाने यांच्या ‘भावेश जोशी’ या चित्रपटातून झळकणार आहे. मुलाकडे चित्रपट असला तरी या क्षेत्रात यश मिळविण्यासाठी हर्षवर्धनने व्यावसायिक चित्रपट निवडावे असे अनिल कपूर यांना वाटते. यासाठी सलमानने हर्षवर्धनला मंत्र द्यावा, यासाठी अनिल कपूर प्रयत्नशील आहेत.

चित्रपटाची योग्य निवड करुन व्यावसायिक चित्रपट निवडण्यामध्ये आजच्या घडीला सलमान बॉलिवूडमधील मास्टर असल्याचे मानले जाते.  सलमानप्रमाणे चित्रपट निवडावे अशी अनिल कपूरची इच्छा हर्षवर्धनला उमगणार का? तसेच त्याला ही गोष्ट उमगल्यानंतर सलमान त्याला गुरुमंत्र देणार का? हे येणारा काळच ठरवेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 14, 2016 10:14 pm

Web Title: bollywood anil kapoor wants harshavardhan kapoor to take tips from salman khan
Next Stories
1 आपला ‘तो’ सीन पाहून प्रियांकाने लपविला चेहरा
2 मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान उपेंद्र लिमयेच्या हाताला दुखापत
3 ‘माझ्या आईला वाटायचे अक्षय कुमार गे आहे’
Just Now!
X