News Flash

बॉलिवूड आर्टिस्ट सुरज गोदांबेला अटक; घरात सापडले कोट्यवधींचे ड्रग्स

ड्रग्ज प्रकरणी बॉलिवूडमधील आणखी एक कलाकार एनसीबीच्या ताब्यात

अंमली पदार्थ विरोधी पथक सध्या बॉलिवूड ड्रग्ज माफियांवर करडी नजर ठेवून आहे. परिणामी गेल्या काही काळात ड्रग्ज प्रकरणी सारा अली खान, रकुल प्रित सिंह, सिमोन खंबाटा, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर, दिया मिर्झा, अबिगल पांडे, भारती सिंह यांसारख्या अनेक नामांकित बॉलिवूड कलाकारांची नाव समोर आली. या यादीत आता आणखी एका कलाकाराचं नाव समोर आलं आहे. प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट सुरज गोदांबे याला एनसीबीनं ड्रग्ज प्रकरणी ताब्यात घेतलं आहे.

अवश्य पाहा – करोना आणि क्षयरोग यांच्यात काय फरक आहे?

एनसीबीनं गुरुवारी सकाळी त्याच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी त्याच्या घरात जवळपास दोन कोटी ५० लाख रुपयांचे ड्रग्स सापडले. शिवाय १३ लाख ५१ हजार रुपयांची रोख रक्कम सापडली. या पैशांचा हिशोब त्याला देता आला नाही. परिणामी एनसीबीने त्याला अटक केली आहे. सध्या त्याची चौकशी सुरु आहे. या चौकशीत बॉलिवूडमधील आणखी काही नावं समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अवश्य पाहा – VJ ते प्रसिद्ध अभिनेत्री; ७ वर्षात यशाच्या शिखरावर पोहोचणाऱ्या चित्राची आत्महत्या

यापूर्वी एनसीबीने कॉमेडियन भारती सिंहच्या घरावर छापा टाकला होता. त्यावेळी तिच्याही घरात अंमली पदार्थ आढळून आले होते. चौकशीत भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचियाने अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याची कबुली दिल्यानंतर एनसीबीने तिला ‘एनपीडीएस’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली होती. त्यानंतर या दोघांना न्यायालयाने १४ दिवसांची म्हणजे ४ डिसेंबरपर्यंत न्यायलयीन कोठडी सुनावली. ज्यानंतर भारती आणि तिच्या पतीने जामिनासाठी अर्ज केला होता. जो मंजूर करण्यात आला असून दोघांनाचाही जामीन मंजूर झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2020 4:45 pm

Web Title: bollywood artiste suraj godambe arrests in drugs case mppg 94
Next Stories
1 डाएट विसरुन कियाराने केली समोसा पार्टी; पाहा व्हिडीओ
2 ‘विकासने मला चुकीच्या पद्धतीने…’, अर्शी खानने विकास गुप्तावर केला आरोप
3 अ.भा.मराठी चित्रपट महामंडळाचा वाद मिटला; मेघराज राजेभोसले यांची पुन्हा अध्यक्षपदी निवड
Just Now!
X