24 April 2019

News Flash

हॅकर्सच्या हिटलिस्टवर बॉलिवूड सेलिब्रिटी

सेलिब्रिटींचे हॅक झालेले अकाऊंट ट्विटरकडून पूर्ववत करण्यात आले.

अभिषेक बच्चन, अनुपम खेर, निम्रत कौर

काही नामवंत व्यक्तींचे ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याची माहिती बुधवारी समोर आली. एकापाठोपाठ एक अनुपम खेर, अभिषेक बच्चन यांच्यानंतर अभिनेत्री निम्रत कौरचेही ट्विटर अकाऊंट हॅक झाले. त्यामुळे तुर्किश आर्मी ग्रुप या हॅकर ग्रुपच्या हिटलिस्टवर बॉलिवूड सेलिब्रिटी असल्याचे पाहायला मिळत आहे.

निम्रतला ट्विटरवर एक मेसेज आला. तो वाचण्यासाठी डायरेक्ट मेसेजचा विंडो तिने ओपन केला आणि क्षणार्धात अकाऊंट हॅक झाल्याचे तिला कळले. याबाबत तातडीने ट्विटरशी संपर्क साधला आणि त्यानंतर अकाऊंट पूर्ववत करण्यात आले. मात्र, पुढील काही तासांतच पुन्हा ते हॅक झाले. बुधवारी संध्याकाळपर्यंत पुन्हा निम्रतचा अकाऊंट ट्विटरकडून पूर्ववत करण्यात आला.

अनुपम खेर यांनाही एका व्यक्तीकडून लिंक आली आणि ती उघडल्यावर त्यांचे अकाऊंट हॅक झाले. तुर्किश आर्मी ग्रुपने हे अकाऊंट हॅक केल्याची माहिती खेर यांनी स्वतःच दिली होती. तर अभिषेक बच्चनचे अकाऊंट हॅक झाल्यानंतर ट्विटर अकाऊंट अधिकृत असल्याची दर्शवणारी निळी खूण दिसेनाशी झाली. त्याचप्रमाणे तुर्की भाषेतील बरेच ट्विट्ससुद्धा त्याच्या टाइमलाइनवर झळकत होते. अभिषेकचेही अकाऊंट बुधवारी संध्याकाळपर्यंत पूर्ववर करण्यात आले होते. एकंदरीत या हॅकर ग्रुपने सेलिब्रिटींवर निशाणा साधल्याचे दिसून आले.

First Published on February 8, 2018 1:09 pm

Web Title: bollywood celebrities are on the hit list of hackers turkish cyber army eye on b town celebs