28 February 2020

News Flash

चाहत्याने केलेल्या टीकेनंतर भारतीय कलाकारांचा पाकिस्तानी कर्णधाराला पाठिंबा

ही कलाकार मंडळी इतक्यावरच न थांबता त्यांनी या चाहत्याला खडे बोलही सुनावले आहेत

फादर्स डे ला मॅन्चेस्टरमध्ये झालेल्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानवर ८९ धावांनी विजय मिळविला. भारतीय संघाने विश्वचषकात पाकिस्तानला सलग सातव्यांदा पराभवूत केलं. भारताबरोबरच्या मानहानीकारक पराभवानंतर पाकिस्तानी संघाला सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल करण्यात आलं. पाकिस्तानी चाहत्यांनीहीदेखील पाकिस्तानी संघावर आपला राग व्यक्त केला. सध्या पाकिस्तानी संघाच्या कर्णधाराचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक पाकिस्तानी चाहता कर्णधार सरफराजची खिल्ली उडवण्यासाठी लज्जास्पद भाषेचा वापर करत असल्याचं दिसून येत आहे. या व्हिडीओनंतर अनेकांनी सरफराजची बाजू घेतल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे काही भारतीय सेलिब्रिटींनीदेखील सरफराजची पाठराखण केल्याचं दिसून आलं. ही कलाकार मंडळी इतक्यावरच न थांबता त्यांनी या चाहत्याला खडे बोलही सुनावले.

अभिनेता रितेश देशमुख कायमच समाजात घडणाऱ्या घटनांवर त्यांच मत मांडत असतो. सरफराजला ट्रोल होताना पाहताच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने त्याच मत मांडलं आहे. ‘क्रिकेटच्या इतिहासामध्ये अनेक दिग्गज कर्णधारांनी पराभवाचा सामना केला आहे. सरफराज अहमद यांच्यासोबत हे असं व्हायला नको होतं. ही त्यांची मानहानी आहे. त्यांच्यावर टीका करताना निदान या गोष्टीचा तरी विचार करा, की त्यांच्यासोबत त्यांची लहान मुलगी आहे’, असं म्हणत रितेशने ट्विट केलं आहे.

रितेशप्रमाणेच छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री गौहर खाननेदेखील सरफराज यांचा व्हिडीओ शेअर करत ट्रोल करणाऱ्याला उत्तर दिलं आहे. ‘किती मुर्ख व्यक्ती आहे हा, याचं नाव जाहीर करा आणि त्याला लाज वाटू द्या. जर एखादा खेळाडू चांगली कामगिरी करु शकला नाही, तर आपण त्याच्यासोबत कसंही वैर्तन करावं का ? या निर्लज्ज माणसाला लाज वाटली पाहिजे. जेव्हा या माणसाजवळ त्याची लहान मुलगी तेव्हा त्याच्यासोबत देखील असंच व्हावं, मग त्याला समजेल. इतकंच नाही तर याच्या आई-वडीलांनी त्याच्या कानशिलात लगावल्या पाहिजेत’, असं गौहर खान म्हणाली.

‘लज्जास्पद, सरफराज तुम्ही योग्य केलत. मात्र जेव्हा तुमच्या मुलीसमोर हा इसम तुम्हाला वाईट भाषेत बोलत असताना जर तुम्ही त्याच्या कानशीलात लगावली असती तर मला जास्त आनंद झाला असता’, असं जय भानुशालीने म्हटलं.

बिग बॉसफेम आणि प्रसिद्ध निर्माते विकास गुप्ता यांनीदेखील त्यांचं मत मांडलं आहे. ‘किती लज्जास्पद आहे हा प्रकार. हा एक असा चाहता जो क्रिकेट सामन्यात पराभूत झाल्यानंतर आपल्या खेळाडूवर टीका करतो. हा या गोष्टीचा पुरावा आहे, की हा व्यक्ती किती असंवेदनशील आणि वाईट विचारांचा आहे. सरफराज यांची मुलगीसोबत असताना त्यांवर गलिच्छ भाषेत टीका करुनही हा चाहता गर्वने मिरवत आहे’.

दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून सर्व स्तरांमधून या चाहत्यावर टीका होत आहे. या टीकास्त्रानंतर चाहत्याने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करत सरफराज यांची माफी मागितली आहे.

 

First Published on June 25, 2019 11:46 am

Web Title: bollywood celebrities reaction on pakistan captain sarfraz ahmed video ssj 93
Next Stories
1 अभिजीत बिचुकले पुन्हा बिग बॉसच्या घरात जाणार?
2 Video Viral : ‘तुझ्यात जीव रंगला’मधील प्रामाणिक राणादा होणार चोर
3 रितेशच्या फोटोवर कमेंट करताच जेनेलिया सिद्धार्थ जाधवला म्हणाली..
Just Now!
X