18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

…या गोष्टींना सेलिब्रिटीही घाबरतात

त्यांना 'फोबिया' असलेल्या गोष्टी जाणून तुमच्याही भुवया उंचावतील

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: August 9, 2017 5:02 PM

बॉलिवूड सेलिब्रिटी

एखादी व्यक्ती कितीही धैर्यवान असली तरीही आयुष्यात अशी एक गोष्ट असते ज्याची भिती आपल्या मनात कायम बसलेली असते. ही बाब अतिशय सामान्य आहे. भिती ही कोणत्याही प्रकारची असू शकते आणि ती कोणालाही वाटू शकते. अगदी चित्तथरारक स्टंट्स करणाऱ्या अभिनेते आणि अभिनेत्रींनाही अशाच काही गोष्टींची भिती वाटते. मुख्य म्हणजे बी- टाऊन सेलिब्रिटींना अशा गोष्टींची भिती वाटते ज्यांची तुम्ही कल्पनाही केली नसेल. या सर्व गोष्टींना ‘फोबिया’ म्हणूनही ओळखलं जातं. ही खरंतर गमतीशीर बाब आहे. पण, ते म्हणतात ना ‘डर सबको लगता है…’ ते खरंच आहे.

बॉलिवूडची ‘स्टुडण्ट’ आलिया भट्ट अंधाराला फार घाबरते. लहान असताना तिला एका अंधाऱ्या खोलीत बंद केल्यापासूनच ती अंधाराला घाबरते.

अभिनेता अर्जुन कपूर सिलींग फॅनला घाबरतो. सिलींग फॅनमुळे तो फार घाबरतो. त्यामुळे ‘मै तो सुपरमॅन’ म्हणणारा हा अभिनेतासुद्धा सिलींग फॅनसारख्या सर्वसामान्य गोष्टीला घाबरतो ही बाब अनेकांनाच आश्चर्याचा धक्का देऊन गेली.

सहसा उंच इमारतींमध्ये लिफ्टचा वापर केला जातो. कित्येकजणांना लिफ्टबद्दल भारीच कुतूहल असतं. पण, अभिनेत्री सोनम कपूरचं मात्रं तसं नाहीये. कारण, सोनम लिफ्टला घाबरते.

सहसा पाल किंवा झुरळाला मुली भितात. पण, ‘सावरिया’ रणबीरही या गोष्टींना भितो यावर कुणाचा विश्वास बसेल का? पण, हे खरंय. रणबीर झुरळांना फार घाबरतो.

आपल्या अनोख्या आणि मनमिळाऊ अंदाजासाठी ओळखल्या जाणाऱ्या अनुष्का शर्माला बाइक रायडिंगची भिती वाटते.

बॉलिवूडचा किंग खानही एका गोष्टीला घाबरतो. ती गोष्ट म्हणजे घोडे. बऱ्याच चित्रपटांमध्ये विविध स्टंट्स करणाऱ्या शाहरुख चित्रपटांमध्ये घोडेस्वारीची दृश्य सहसा टाळतो.

वाचा : गोष्ट पहिल्या सुपरस्टारच्या पहिल्या प्रेयसीची…

बॉलिवूडची ‘मस्तानी’ म्हणजेच अभिनेत्री दीपिका पदुकोण सापांना फार घाबरते.

केकमुळे कोणाला घाबरवता येऊ शकतं यावर तुमचाही विश्वास बसणार नाही. पण, बॉलिवूड अभिनेता अजय देवगणला केकची भिती वाटते तो स्वत:च्या वाढदिवशीसुद्धा केक कापत नाही असं म्हटलं जातंय.

‘जिंदगी मिलेगी ना दोबारा’ या चित्रपटामध्ये टोमॅटीना फेस्टिव्हलमध्ये मोठ्या उत्साहात सहभागी झालेल्या कतरिनाला पाहून अनेकांनाच तिचा हेवा वाटला होता. पण, त्या दृश्यासाठी कॅटला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला होता. कारण तिला टोमॅटोची भिती वाटते.

(वरील माहिती विविध वेबसाइट्सवर उपलब्ध आकडेवारीवरुन मिळाली असून लोकसत्ता ऑनलाइनने याची खातरजमा केलेली नाही)

First Published on August 9, 2017 4:57 pm

Web Title: bollywood celebrities shahrukh khan and katrina kaif fears from these things phobia