25 September 2020

News Flash

बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांचा तनुश्रीला पाठिंबा

रिचा चढ्ढा, स्वरा भास्कर, फरहान अख्तर, परिणिती चोपडा यासारख्या कलाकारांनी तनुश्रीला पाठिंबा दिला आहे.

तनुश्री दत्ता

२००८ साली ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटादरम्यान नानांनी माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असभ्य वर्तन केले, असा खळबळजनक आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ताने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर केला आहे. तनुश्रीच्या या आरोपानंतर कलाविश्वात याविषयी जोरदार चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. काही कलाकारांनी या मुद्द्यावर बोलणं टाळलं आहे. तर काही कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तनुश्रीला पाठिंबा दर्शविला आहे.

तनुश्रीने एका मुलाखतीमध्ये #metoo मोहीमेबद्दल बोलताना नानांनी केलेल्या असभ्य वर्तनावर भाष्य केलं आहे. यानंतर प्रियांका चोपडा, ट्विंकल खन्ना, रिचा चढ्ढा, स्वरा भास्कर, फरहान अख्तर, परिणिती चोपडा यासारख्या कलाकारांनी तनुश्रीला सपोर्ट केल्याचं पाहायला मिळत आहे.

सध्या सोशल मीडियावर #IBelieveYouTanushreeDutta हा ट्रेंड सुरु असून या ट्रेंडअंतर्गत या कलाकारांनी तनुश्रीला पाठिंबा दिला आहे. प्रियांकाने तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन फरहान अख्तरचं ट्विट रिट्विट केलं आहे.  तर ‘कोणतीही महिला तिची बदनामी होईल असं वक्तव्य करणार नाही. मात्र तनुश्रीसोबत ते प्रत्यक्षात घडलं त्यामुळेच तिने बदनामीची भिती न बाळगता आवाज उठविला आहे’, असं रिचा चढ्ढा म्हणाली.

‘तनुश्रीवर टीका करण्यापूर्वी किंवा तिला अयोग्य ठरविण्यापूर्वी नीट विचार करा, कामाच्या ठिकाणी स्त्रियांना अशा गोष्टींना सामोरं जावं लागत आहे ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे’, असं ट्विंकल खन्ना म्हणाली. तर कायमच रोकठोक बोलणाऱ्यामुळे चर्चेत राहणाऱ्या स्वरा भास्करनेही एक व्हिडिओ शेअर करत तनुश्रीला पाठिंबा दिला आहे.

दरम्यान, तनुश्रीने नानांवर केवळ हा एकच आरोप केला नसून त्यांनी मनसेकडून मला आणि माझ्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचं देखील दिली आहे, असं म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2018 1:40 pm

Web Title: bollywood celebrity supported tanushree dutt on nana patekar controversy
Next Stories
1 Happy Birthday Ranbir Kapoor : आलियाने खास पद्धतीने दिल्या बॉयफ्रेण्ड रणबीरला शुभेच्छा
2 प्रदीप पटवर्धन “मोरूच्या मावशी”ची तिकिटं ब्लॅकमध्ये विकायचे?
3 ज्येष्ठ संगीतकार राम लक्ष्मण यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर
Just Now!
X