22 November 2019

News Flash

बॉलिवूड कलाकारांचा भारतीय संघाला धीर

भारतीय संघाच्या आत्ता पर्यंतच्या कामगिरीचा अभिमान असल्याची भावना कलाकारांनी व्यक्त केली आहे

विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यफेरीत न्यूझीलंडने भारताला १८ धावांनी पराभूत केले. या पराजयासह भारताचे तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न धूळीस मिळाले. संपूर्ण विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने दमदार कामगिरी केली. भारताने उपांत्य फेरीमध्ये स्थान पटकावले नसले तरी संघाच्या कामगिरीची सर्वच स्थारांमध्ये वाह वाह होत आहे.

बॉलिवूड अभिनेता आमिर खानने भारतीय संघासाच्या पराभवानंतर ट्विट करत संघाला धीर दिला आहे. त्या पाठोपाठ अनेक बॉलिवूड कलाकारांनी देखील ट्विट केले आहे. यामध्ये अभिनेते बोमन ईराणी, आयुषमान खुराना, सुनिल शेट्टी, वरूण धवन, अनुपम खेर इत्यादी अभिनेत्यांचा समावेश आहे. त्यांनी ट्विटमध्ये आम्हाला भारतीय संघाचा अभिमान वाटतो, धन्यवाद टीम इंडिया असे म्हणत संघाला धीर दिला आहे. त्यांचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

First Published on July 11, 2019 1:51 pm

Web Title: bollywood celebrity tweet for team india avb 95
Just Now!
X