News Flash

घटस्फोटानंतरही या बॉलिवूड कलाकारांमध्ये आहे मैत्रीचे नाते

चला पाहूया अशा पाच जोड्या

बॉलिवूडचे कलाकार नेहमीच कोणत्याना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. मग त्या चांगल्या गोष्टी असो किंवा वाईट गोष्टी असो चर्चा तर होतच असते. बॉलिवूडमध्ये अनेकदा कलाकार लग्नबंधनात अडकतात तर काही कलाकार एकमेकांपासून घटस्फोट घेऊन विभक्त होत असतात. बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही. मात्र विभक्त झाल्यानंतर देखील त्यांच्यातील मैत्रीचे नात कायम आहे. चला पाहूया असेच काही कलाकार…

ह्रतिक रोशन – सुझान खान
अभिनेता ह्रतिक रोशन आणि सुझान खान यांचे २० डिसेंबर २००० मध्ये लग्न झाले. प्रत्येक अर्वाड्स शो आणि कार्यक्रमाला एकत्र उपस्थितीत राहणाऱ्या या जोडप्याने १ नोव्हेंबर २०१४ रोजी घटस्फोट घेतला. चाहत्यांसाठी हा धक्काच होता. २०१८ मध्ये ह्रतिकने सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्याने ‘सुझान आताही माझी सर्वात जवळची मैत्रीण आहे’ असे लिहिले होते. या पोस्टवरुन त्या दोघांमध्ये अजूनही चांगले मैत्रीचे नाते असल्याचे म्हटले जात आहे.

अरबाज खान – मलाईका अरोरा
अभिनेता अरबाज खान आणि मलाईका अरोरा १२ डिसेंबर १९९८ मध्ये विवाह बंधनात अडकले होते. ११ मे २०१७ मध्ये मलायका आणि अरबाजने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोट घेतल्यानंतरही अरबाज मलायकाच्या आईच्या वाढदिवशी हजर होता. तसेच त्याने मलायकाला योगा स्टुडिओ चालू करण्यासाठी पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्यांच्यात मैत्रीचे नाते कायम असल्याचे दिसत आहे.

आमीर खान- रिना दत्ता
अभिनेता आमीर खान आणि चित्रपट निर्माती रिना दत्ता यांचे ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटाच्या वेळी ऐकमेकांवर प्रेम दडले. लग्नानंतर १६ वर्षे संसार केल्यानंतर अखेर २००२ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. रिना ही नेहमीच खान कुटुंबाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असते. आमीर खानने २९ डिसेंबर २००९ रोजी किरण रावसोबत दुसरे लग्न केले. रिना आणि आमीर यांच्यात अजूनही कोणतीही कटुता नसल्यााचे म्हटले जात आहे.

अनुराग कश्यप – कल्की कोचलीन
दिगदर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री कल्की कोचलीन या जोडीने २००९मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘देव डी’ या चित्रपटात एकत्र काम केले. त्यावेळी दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. २०११ मध्ये दोघे विवाहबंधनात अडकले. दोन वर्षे संसार थाटल्यानंतर अनुराग आणि कल्किकेने २०१३ मध्ये घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतरही कल्कि आणि अनुराग ऐकमेकांना भेटत असत. त्यांनी त्यांच्यामधील मैत्रीचे नाते अजूनही तोडलेले नाही. सध्या कल्की गाय हर्शबर्गसोबत रिलेशनशीप मध्ये आहे. तसेच कल्की लवकरच आई होणार आहे.

दिया मिर्झा – साहिल सांघा
अभिनेत्री दिया मिर्झा आणि साहिल सांघा यांनी अकरा वर्षे सोबत राहिल्यानंतर २०१४ मध्ये लग्न केले. लग्ननंतर दिया बॉलिवूडपासून लांब होती. अखेर १ ऑगस्ट २०१९ रोजी या जोडप्याने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतरही दिया आणि साहिल एकत्र फिरताना दिसतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2019 5:11 pm

Web Title: bollywood celebs after divorce still good friends avb 95
Next Stories
1 ‘हिरकणीला थिएटर द्या, नाही तर काचा फुटणार’, मनसेचा खळखट्याकचा इशारा
2 #Dabangg3 : अखेर सई मांजरेकरच्या भूमिकेवरून उचलला पडदा
3 Video : वर्षभरानंतर अंकुश चौधरी येतोय ‘ट्रिपल सीट’
Just Now!
X