मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थांच्या किंमतीवरून मुंबई हायकोर्टाने फटकारले होते. त्यानंतर राज्य सरकारने मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास बंदी नसल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली. राज्य सरकारच्या या घोषणेनंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.त्यातच आता आणखी एक भर पडली असून चंदेरी दुनियेतील काही सेलेब्सनेही त्यांच्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. इतकच नाही तर काही सेलेब्सने यावर चिंतादेखील व्यक्त केली आहे.

मल्टिप्लेक्समध्ये खाद्यपदार्थ नेण्याबाबात अभिनेत्री पुनम ढिल्लो, गायक सोनू निगम आणि लेखर जीशान कादरी , कैलाश खेर यांनी चिंता व्यक्त करत आक्षेप घेतल्याचं दिसून येत आहे.

मल्टिप्लेक्समध्ये खाद्यपदार्थ आणण्यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. काही प्रेक्षक अंमली पदार्थदेखील आतमध्ये घेऊन येऊ शकतात. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न उद्भवू शकतो. विशेष म्हणजे बाहेरील खाद्यपदार्थ आणण्यास परवानगी दिल्यामुळे आता  प्रेक्षक मांसाहारी पदार्थदेखील आता आणू शकतील आणि या पदार्थांमुळे नंतर होणारा कचरा मल्टिप्लेक्समध्येच टाकून जातील, त्यामुळे स्वच्छतेचा प्रश्न उद्भवू शकतो. तसंच या मसालेदार पदार्थांचा वास चित्रपटगृह,मल्टिप्लेक्समध्ये दरवळू शकतो. या वासामुळे अन्य प्रेक्षकांना त्याचा त्रास होऊ शकतो. तसंच सुरक्षा रक्षकांचं कामही वाढू शकतं, असं पुनम यांनी सांगितलं.

Shopping time at infinity mall !! #edhardy #tshirts #timepass #masti

A post shared by Syed Zeeshan Quadri (@zeishanquadri) on

मल्टिप्लेक्समध्ये लोक चित्रपट पाहायला येतात. जेवायला नाही, असं लेखन जीशान कादरी म्हणाले. तर मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यावरील बंदी कायम ठेवावी. कारण असं न केल्यास चित्रपटगृह मालकांच्या व्यवसायावर परिणाम होऊ शकतो. असं मत सोनू निगमने व्यक्त केलं आहे. त्यामुळे  राज्य सरकारने मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यावरील बंदी जरी उठविली असली तरी चित्रपटसृष्टीतील सेलेब्सला हा निर्णय काही मान्य नसल्याचं पाहायला मिळत आहे.