News Flash

बॉलिवूड कलाकारांनी अशा दिल्या होळीच्या शुभेच्छा

अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने, अक्षय कुमार, हेमा मालिनी आणि हृतिक रोशनने चाहत्यांना ट्विटरव्दारे धुळवडीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

बॉलिवूड कलाकारांनी दिल्या होळीच्या शुभेच्छा

होळी म्हणजे रंगांचा सण. हा सण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करण्यासाठी प्रत्येक जण एकमेकांना शुभेच्छा देत असतो. मग ते प्रत्यक्षात एकमेकांना रंग लावून असो किंवा सोशल मीडियाव्दारे एकमेकांना दिलेल्या शुभेच्छा असो. सगळेच जण आपापल्या पद्धतीने होळीचा आनंद लुटत असतो.

त्यात बॉलिवूड कलाकारही मागे नाहीत. अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने, अक्षय कुमार, हेमा मालिनी आणि हृतिक रोशनने चाहत्यांना ट्विटरव्दारे धुळवडीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेता अक्षय कुमारने ट्विटरव्दारे ‘ही होळी तुमच्या आयुष्यात आणखी नवे रंग घेऊन येवो. होळीच्या आणि नवरोजच्या सर्वांना शुभेच्छा’ असे लिहून ट्विट केले.

‘ही होळी तुम्हाला आनंदाची, सुखाची जावो. सर्वांना होळीच्या शुभेच्छा’ असे म्हणत हृतिक रोशनने चाहत्यांना ट्विटरव्दारे होळीच्या शुभेच्छा दिल्या.

तसेच माधूरी दिक्षित, हेमा मालिनी, इम्रान हाश्मी, मधूर भंडारकर, अमित शाह, इशा देओल इत्यादींनी चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2019 1:07 pm

Web Title: bollywood celebs sends out colourful wishes to fans
Next Stories
1 समलैंगिक संबंधांवर भाष्य करणाऱ्या ‘३७७ अब नॉर्मल’ चित्रपटाची नेटकऱ्यांकडून प्रशंसा
2 सुशांतनं साराला केलं अनफॉलो
3 Filmfare Awards : त्यापेक्षा पुरस्कार न मिळालेला बरा, ‘बधाई हो’च्या लेखकांची नामांकनातून माघार
Just Now!
X