संपूर्ण देशभरात सध्या स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात पार पडला जात आहे. देशाच्या 73 व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह सर्वत्र पहायला मिळत आहे. बॉलिवूडमधील सर्व कलाकारांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामध्ये बॉलिवूडचे बिग बी, अभिनेता अजय देवगन, अभिनेत्री काजोल, ऋषी कपूर, सोनू सूद, आयुषमान खुराना आणि इतर कलाकारांचा समावेश आहे.

बॉलिवूडचे शहेनशा अमिताभ बच्चन यांनी त्यांचा फोटो पोस्ट करत सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी भारताच्या राष्ट्रध्वजाला सलाम करतानाचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे आणि त्यावर ‘स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा’ असे लिहिले आहे.

अजय देवगणने सर्वांना ७३व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

लोकप्रिय कवी विश्वास यांनी त्यांच्या कवितेनून १५ ऑगस्टच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

केसरी चित्रपटातील ‘तेरी मिट्टी’ हे गाणे लिहिणारे मनोज मुंतशिर यांनी देखील देशवासीयांना १५ ऑगस्टच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच अभिनेता वरुण धवन, हुमा कुरेशीने देखील ट्विरद्वारे सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.