News Flash

बॉलिवूडचा कॉमेडी किंग गोविंदा अडकला कायद्याच्या कचाट्यात

समन्स देऊनही गोविंदाने त्याला उत्तर देणे जरुरीचे समजले नाही

गोविंदा

बॉलिवूडच्या कॉमेडी किंग गोविंदासाठी हे वर्ष फारच खडतर आहे असंच म्हणावं लागेल. नुकताच त्याचा आलेला ‘आ गया हिरो’ सिनेमा तिकीट बारीवर सपशेल आपटला. तिकीट बारीवरच हा सिनेमा अयशस्वी ठरला असे नाही तर प्रेक्षकांचे मन जिंकण्यातही गोविंदाला यश आले नाही. पण आता अभिनेता, माजी खासदार गोविंदाला कर विभागासमोर उभे राहावे लागणार आहे. ७० लाख रुपयांचा सेवा कर न भरल्याने त्याला समन्स पाठवण्यात आला आहे.

येत्या काही दिवसांत ७० लाखांची थकबाकी भरेन असे आश्वासन गोविंदाने स्वतः जुहू ऑफिसमध्ये जाऊन दिल्याची माहिती कर विभागातील अधिकाऱ्याने पीटीआयला दिली. गोविंदाला या प्रकरणासंदर्भात फोन आणि मेसेज केले असता त्याने प्रतिक्रिया देणे टाळले.
कर विभागातील अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या तीन वर्षांची गोविंदाची बॅलन्सशीट पाहण्यात आली आहे. या काळात त्याने वेगवेगळ्या उत्पादनांच्या जाहिराती, अभिनय यांमधून सुमारे पाच कोटींची कमाई केली आहे.

या मिळकतीतून गोविंदाने ७० लाख रुपयांचा कर भरणे अपेक्षित होते. पण समन्स येईपर्यंत त्याने हा कर भरलाच नव्हता. समन्स देऊनही गोविंदाने त्याला उत्तर देणे जरुरीचे समजले नाही. शेवटी जुहूच्या राहत्या घरी गोविंदाचा जबाब नोंदवण्यासाठी अधिकाऱ्यांना जावे लागले. पण तेव्हा गोविंदा घरी नव्हता. शेवटी गोविंदाला त्याच्या ऑफिसमध्ये गाठून त्याचा जबाब नोंदवण्यात आला. यात त्याला कर विभागाच्या जुहू कार्यालयात हजेरी लावण्यासही सांगण्यात आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2017 6:31 pm

Web Title: bollywood comedy king govinda lands in legal trouble here is why
Next Stories
1 दीपिका, अनुष्का, वरुणसह राणी मुखर्जीचा ‘दोस्ताना’
2 एफआयआर दाखल झाल्यानंतर शिरीषने मागितली योगी आदित्यनाथांची माफी
3 Phillauri Box Office Collection : जाणून घ्या, ‘फिल्लौरी’ची पहिल्या दिवसाची कमाई
Just Now!
X