News Flash

‘विरुष्का’चा विवाहसोहळा पाहून ‘या’ बॉलिवूड दिग्दर्शकाला रडूच कोसळलेलं

अनुष्का आणि विराट ही जोडी अगदी सुरुवातीपासूनच चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती.

विराट कोहली, अनुष्का शर्मा

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारती क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांनी गेल्या वर्षअखेरीस लग्नगाठ बांधली. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या विवाहसोहळ्याविषयीच्या बऱ्याच गोष्टी गुलदस्त्यात ठेवण्यात आल्या होत्या. पण, अखेर त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले आणि विरुष्काचं हे लग्न म्हणजे बहुचर्चित गोष्ठ ठरली. खुद्द करण जोहरही हा सेलिब्रिटी विवाहसोहळा पाहून भारावून गेला होता, भावूकही झाला होता.

सध्याच्या घडीला करण एका रेडिओ शोच्या निमित्ताने श्रोत्यांच्या भेटीला आला असून, याच रेडिओ शोमध्ये त्याने या गोष्टीचा उलगडा केला. सर्वसामान्यांप्रमाणेच करणलाही अनुष्का आणि विराटचा विवाहसोहळा पाहिल्यानंतर ‘लग्नसोहळा असावा कर असा’, असं वाटू लागलं होतं. किंबहुना विराटच्या गळ्यात हार घालण्यासाठी अनुष्का ज्यावेळी त्याच्या दिशेने आली होती, हे पाहून त्याला अक्षरश: भरुन आलं होतं. भावभावनांचा खेळच होता तो जणू.

वाचा :  निकसोबत प्रेमाचा महाल उभा कर.. आईचा आपुलकीचा सल्ला

अनुष्का आणि विराट ही जोडी अगदी सुरुवातीपासूनच चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती. त्यातही त्यांच्या स्वप्नवत विवाहसोहळ्यानंतर अनेकांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. सोशल मीडियावरही त्यांचा विवाहसोहळा तितकाच गाजला असून, आताही त्याचा विषय निघाल्यावर काय आणि किती बोलावं अशीच काहींची अवस्था होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2018 11:54 am

Web Title: bollywood director karan johar wanted to get married after watching virat kohali anushka sharmas wedding
Next Stories
1 तुम्हाला नसलेलं सोयर सुतक आम्ही पाळलं, विजय चव्हाणांवरील कुंडलकरांच्या पोस्टला जितेंद्रचं सडेतोड उत्तर
2 ‘अगडबम’ची नाजुका पुन्हा परतणार
3 चित्र  रंजन : तरीही ‘हॅप्पी’ नाहीच!
Just Now!
X