News Flash

करण जोहरच्या घरात झाली होती ड्रग्ज पार्टी? एनसीबीकडून चौकशीची शक्यता

पार्टीत बॉलिवूडच्या मोठमोठ्या सेलिब्रेटींनी लावली होती हजेरी

ड्रग्ज प्रकरणी एनसीबी बॉलिवूड दिग्दर्शक-निर्माता करण जोहरची चौकशी करण्याची शक्यता आहे. करण जोहरच्या घरी २०१९ मध्ये ड्रग्ज पार्टी झाल्याचा संशय आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, करण जोहरच्या पार्टीत बॉलिवूडच्या मोठमोठ्या सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. दीपिका, विकी कौशल, रणबीर कपूर, वरुण धवन, झोया अख्तर, शाहीद कपूर, मलायका अरोरा यांच्यासहित अनेक सेलिब्रेटी पार्टीत उपस्थित होते. पार्टीत हजेरी लावलेल्या सर्व सेलिब्रेटींना एनसीबीकडून समन्स बजावला जाण्याची शक्यता आहे.

याआधी एनसीबीकडून ड्रग्ज चॅटच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपची अ‍ॅडमिन असल्याचा खुलासा कऱण्यात आला होता. दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाश आणि जय साहा या ग्रुपमध्ये होते. करिश्माची एनसीबीकडून चौकशी सुरु आहे. तर दीपिका उद्या चौकशीसाठी एनसीबीसमोर हजर होणार आहे.

दुसरीकडे अभिनेत्री रकुलप्रीत सिंहने चौकशीदरम्यान रियासोबत ड्रग्जसंबंधी चर्चा केल्याचं मान्य केलं आहे. आपल्या घरात ड्रग्ज होते, पण त्यांचं सेवन केलं नाही असं तिने सांगितलं आहे. हे ड्रग्ज रियासाठी होते असा दावा तिने केला आहे. रकुल शुक्रवारी सकाळी चौकशीसाठी एनसीबीसमोर हजर झाली होती. त्यानंतर दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाशही पोहोचली होती.

ड्रग्ज प्रकरणी एनसीबीकडून दीपिका, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकूलप्रीत सिंह यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2020 6:51 pm

Web Title: bollywood director producer karan johar on ncb radar over alleged drug party sgy 87
Next Stories
1 ‘कमबॅक करायचा असेल तर करण जोहरच्या…’, सुचित्रा कृष्णमूर्तिचा खुलासा
2 ‘माल है क्या?’ असे विचारलेल्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपची अ‍ॅडमिन होती दीपिका?
3 ‘दोन दिवसात घरी परत येईन’, बालसुब्रमण्यम यांचा शेवटचा व्हिडीओ व्हायरल
Just Now!
X