News Flash

Sooryavanshi: ‘रोहित शेट्टी तुला लाज वाटली पाहिजे’, कतरिना कैफचे चाहते संतापले

दिग्दर्शक रोहित शेट्टीचा आगामी चित्रपट सुर्यवंशी लवकरच प्रदर्शित होणार आहे

दिग्दर्शक रोहित शेट्टीचा आगामी चित्रपट सुर्यवंशी लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत आहेत. पण सोशल मीडियावर कतरिना कैफच्या चाहत्यांकडून रोहित शेट्टीविरोधात ट्रेंड सुरु आहे. यामागचं कारण म्हणजे रोहित शेट्टीने कतरिना कैफसंबंधी केलेलं एक वक्तव्य तिच्या चाहत्यांना अजिबात आवडलेलं नाही. रोहित शेट्टीने चित्रपटाच्या शेवटच्या सीनसंबंधी बोलताना म्हटलं होतं की, कोणाचंही लक्ष कतरिना कैफकडे जाणार नाही. रोहित शेट्टीचं हे वक्तव न आवडल्याने तिच्या चाहत्यांकडून ट्विटरवर ‘shame on Rohit Shetty’ ट्रेंडिंग होत आहे.

कतरिनाच्या चाहत्यांनी रोहित शेट्टीला सुनावत त्याने सर्व अभिनेत्यांचा आदर केला पाहिजे असं म्हटलं आहे. ट्विटरवर अनेकांनी आपली नाराजी आणि संताप व्यक्त केला आहे.

नेमकं काय म्हणाला रोहित शेट्टी ?
सुर्यवंशी चित्रपटाच्या शेवटच्यी सीनमध्ये अक्षय कुमार, रणवीर सिंग, अजय देवगण आणि कतरिना कैफ दिसणार आहेत. रोहित शेट्टीने या सीनसंबंधी बोलताना म्हटलं होतं की, “तुम्हाला तीन वेळा हा सीन पहावा लागेल. या सीनमध्ये स्फोट दाखवण्यात आले असून कतरिना कैफही दिसत आहे. जर तुम्ही नीट पाहिलंत तर कतरिनाचे डोळे मिटत आहेत. चौथ्या शॉटनंतर कतरिनाने माझ्याकडे येऊन अजून एकदा हा सीन घेऊयात का असं विचारलं. त्यावर मी तिला सांगितलं की, खरं सांगायचं तर तुझ्याकडे कोणीही पाहणार नाही. यावर तिला खूप राग आहे. हे तू कसं काय सांगू शकतोस ? अशी विचारणा तिने केली. ती खूप चिडली होती. त्यावर मी तिला सांगितलं की, तिघे मागे स्फोट सुरु असताना चालत असताना कोणीही तुझ्याकडे पाहणार नाही. मी तोच सीन ठेवला आहे. यामध्ये तुम्हाला कतरिनाचे डोळे बंद होताना दिसतील. पण कोण पाहणार?”.

सिंघम, सिम्बा नंतर रोहित शेट्टीचा सुर्यवंशी चित्रपट येत आहे. चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असून अजय देवगण आणि रणवीर सिंगही पाहुणे कलाकार म्हणून दिसणार आहेत. २४ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 9, 2020 5:15 pm

Web Title: bollywood director rohit shetty film sooryavanshi katrina kaif twitter shame on you rohit shetty sgy 87
Next Stories
1 Samantar Trailer : स्वप्नीलच्या दुहेरी भूमिकेने वाढवली उत्कंठा
2 Video : मोदींसारखीच रजनीकांतही करणार बेअर ग्रिल्ससोबत जंगल सफारी
3 दीपिकाच्या बिकीनी फोटोनं वाढवलं सोशल मीडियाचं तापमान
Just Now!
X