03 March 2021

News Flash

नऊ वर्षानंतर ‘ही’ जोडी पडद्यावर एकत्र झळकणार

करण आता पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी नवीन चित्रपट घेऊन येत आहे.

‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणा-या करण जोहरने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. धर्मा प्रोडक्शनअंतर्गत तयार करण्यात आलेला प्रत्येक चित्रपट हिट ठरला असून या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. त्यामुळे करण आता पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी नवीन चित्रपट घेऊन येत आहे. विशेष म्हणजे या नव्या चित्रपटात एक जोडी चक्क नऊ वर्षानंतर एकत्र झळकणार आहे.
‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटातून चंदेरी दुनियेत पुन्हा कमबॅक करणारी करिना कपूर आता पूर्वीसारखी चित्रपटसृष्टीत सक्रिय झाली आहे. त्यामुळे ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटानंतर ती करण जोहरच्या आगामी चित्रपटामध्ये झळकून येणार आहे. तर करिनाबरोबर अक्षयकुमारही स्क्रिन शेअर करणार आहे.

करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनअंतर्गत तयार होणा-या या चित्रपटाचं नाव अद्याप जाहीर झालं नसून करिना आणि अक्षय नऊ वर्षानंतर पुन्हा एकत्र काम करणार आहेत. ‘कमबख्त इश्क’ या चित्रपटामध्ये ही जोडी अखेरची झळकली होती.
अक्षयच्या ‘हाऊसफुल ४’  या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर याचवर्षी नोव्हेंबरपासून करणच्या नव्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होणार आहे. अक्षयने यापूर्वी करणच्या ‘केसरी’ या चित्रपटात काम केले असून करिना मात्र पाच वर्षानंतर धर्मा प्रोडक्शनअंतर्गत काम करणार आहे.

राज मेहता दिग्दर्शित  हा चित्रपट दोन कुटुंबांच्या वैवाहिक जीवनावर आधारित असून यात करिना आईची भूमिका साकारणार आहे. तर अक्षय करिनाच्या पतीच्या भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातून महत्वाचा संदेश देण्याबरोबरच रोमॅन्टिक आणि कॉमेडीचा देखील समावेश करण्यात आला आहे. चित्रपटासाठी करिना आणि अक्षय यांची निवड झाली असली तरी अन्य कलाकरांची नावे अद्याप निश्चित नसल्याचे सांगण्यात येत आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2018 4:06 pm

Web Title: bollywood do karan johar production next film
Next Stories
1 एकीकडे अरबाजची कबुली तर दुसरीकडे मुन्नी होतेय बदनाम
2 ही आहेत ‘वीरे दी वेडिंग’ चित्रपट पाहण्यामागची पाच कारणं
3 Box Office Collection: ‘वीरे दी वेडिंग’ने एका दिवसांत केली एवढ्या कोटींची कमाई
Just Now!
X