News Flash

Drugs Case : दिया मिर्झाच्या एक्स मॅनेजरच्या डोक्यावर टांगतील तलवार; कधीही अटक होण्याची शक्यता

ड्रग्स प्रकरणी राहिला फर्निचरवाला समवेत अन्य दोन जणांची नावं समोर

अभिनेता सुशांत सिंह राजपूतचं निधन झाल्यानंतर कलाविश्वातील ड्रग्स प्रकरण समोर आलं. आतापर्यंत या प्रकरणी अनेकांची चौकशी करण्यात आली आहे. तर, कलाविश्वातील काही सेलिब्रिटींची नावदेखील समोर आली आहेत. यात काही दिवसांपूर्वी अभिनेत्री दिया मिर्झाची एक्स मॅनेजर राहिला फर्निचरवाला आणि व्यावसायिक करण सजनानी यांची नाव समोर आली होती.त्यानंतर आता या दोघांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी राहिला फर्निचरवाला आणि करण सजनानी या दोघांकडे २०० किलो गांजा सापडला होता. त्यामुळे त्यांनी ३० जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबईच्या एस्प्लेनेट कोर्टाने हा निर्णय दिला आहे. त्यानंतर आता अमली पदार्थ विरोधी पथकाकडून म्हणजेच एनसीबीकडून एक नवा खुलासा करण्यात आला आहे. त्यानुसार, करण, राहिला आणि शाहिस्ता फर्निचरवाला यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अलिकडेच अमली पदार्थ विरोधी पथकाने सुशांत सिंह राजपूतचा जवळचा मित्र आणि माजी असिस्टंट डायरेक्ट ऋषिकेश पवार याला ताब्यात घेतलं आहे. ऋषिकेश हा सुशांतच्या ड्रीम टीम प्रोजेक्टचा मॅनेजर होता. २०१८-१९ या वर्षात ऋषिकेषने सुशांत सोबत काम केलं आहे.
दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर कलाविश्वातील ड्रग्स प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणी आतापर्यंत सारा अली खान, रकुल प्रीत सिंह, श्रद्धा कपूर, अर्जुन रामपाल, दीपिका पदुकोण या सारख्या अनेक दिग्गज कलाकारांची नाव समोर आली असून त्यांची एनसीबीने चौकशी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 4, 2021 1:55 pm

Web Title: bollywood drug case actress dia mirza ex manager rahila furniturewala and two more arrested by ncb ssj 93
Next Stories
1 “एका ट्विटमुळे तुमच्या ऐक्याला बाधा पोहचत असेल तर तुम्हाला…”; सेलिब्रिटींना लगावला टोला
2 “१६ जुलै २०२१ रोजी राष्ट्रीय सुट्टी जाहीर करा”, पंतप्रधान मोदींना पाठवलं पत्र
3 indian idol 12 : …म्हणून पद्मिनी कोल्हापुरेंनी सायलीला दिलं ‘हे’ मराठमोळं गिफ्ट
Just Now!
X