News Flash

Coronavirus : घरी बसून कंटाळलात? आता ओटीटी प्लॅटफॉर्म देतोय फ्री सबस्क्रिप्शन

या फ्लॅटफॉर्मने दिलेला कोट वापरून फ्री सबस्क्रिप्शन मिळवा

सध्या संपूर्ण देशात करोनाची भीती पाहायला मिळते. भारतात देखील करोनाचा परिणाम मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो आहे. देशात करोनाग्रस्त रूग्णांची संख्या १५० च्या पुढे गेली आहे. तर महाराष्ट्रात करोनाचे सर्वाधिक रूग्ण सापडले आहेत. हवेमार्फत पसरणाऱ्या या संसर्गजन्य रोगाला थांबवण्यासाठी अनेक युरोपीय देशांनी संपूर्ण शहरेच लॉक डाऊन केली आहे. अनेक सार्वजनिक सेवा बंद करण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर अनेकांना घरु काम करण्यास सांगितले आहे. त्यामुळे अनेक लोक घरबसल्या करमणूकीचे साधने शोधत आहेत.

छोट्या पडद्यावरील मालिका आणि चित्रपटांचे चित्रीकरण थांबवण्यात आले आहे. त्यामुळे अनेक जण ऑनलाइन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मकडे वळत असल्याचे दिसत आहे. अशातच ‘इरोस नाउ (Eros Now)’ने प्रेक्षकांना दोन महिन्यासाठी फ्री सबस्क्रिप्शन दिले आहे. त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन याची घोषणा केली आहे.

इरोस नाउने फ्री सबस्क्रिप्शनची घोषणा करत एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री तापसी पन्नू आहे. ‘विकीसारखे वागू नका. सध्याच्या परिस्थितीमध्ये कुटुंबीयांसोबत आनंदात वेळ घालवण्यासाठी सोपा उपाय आहे. इरोसचे दोन महिन्याचे फ्री सबस्क्रिप्शन दिले आहे’ अशा आशयाचे ट्विट त्यानी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2020 11:31 am

Web Title: bollywood eros now is offering two months free subscription amid the coronavirus avb 95
Next Stories
1 गुरुनाथला महागात पडणार ‘माया’जाल; राधिका-शनायाने आखला नवा डाव
2 कियारा अडवाणीची पाकिस्तानमध्येही क्रेझ; ‘या’ अभिनेत्रीने केली तिची कॉपी
3 Coronavirus : कोणी हात मिळवण्याचा प्रयत्न केल्यास करीना करते ‘हे’ काम
Just Now!
X