गेल्याच आठवड्यात इशा अंबानी- आनंद पिरामल यांची प्री वेडिंग पार्टी पार पाडली. या पार्टीसाठी बॉलिवूडमधले जवळपास सर्वच कलाकार उपस्थित होते. बॉलिवूडमधल्या अनेक सेलिब्रिटी जोडप्यांचा परफॉर्मन्सही यावेळी आयोजित करण्यात आला होता मात्र या पार्टीसाठी बॉलिवूडमधले अनेक एक्स कपल्सही पाहायला मिळाले. एरव्ही एकमेकांविषयी मनात वैर ठेवून वागणारे अनेक कलाकार पार्टीत मात्र एकाच छाताखाली वावरताना दिसले.

यात ऐश्वर्या, अभिषेक, करिश्मा, कतरिना, रणबीर, सलमान अशा अनेक कलाकारांचा समावेश होता. ऐश्वर्या आणि सलमान यांचं प्रेमप्रकरण आणि त्यानंतर सलमाननं केलेली गैरवर्तणुक ही सगळ्यांच ठावूक होती. सलमानशी ब्रेकअप झाल्यानंतर काही वर्षांनी ऐश्वर्यानं अभिषेकशी लग्न केले. यानंतर सलमान आणि ऐश्वर्यानं एकमेकांसमोर आपण येणार नाही याची पुरेपुर खबरदारी घेतली. मात्र पार्टीत हे दोघंही एकत्रच पाहायला मिळाले.

याच पार्टी करिश्मा कपूर अभिषेक बच्चनही होते. मात्र ऐश्वर्यानं सारं वैर विसरून करिश्मासोबत डान्सही केला. ऐश्वर्याशी लग्न होण्याआधी अभिषेक बच्चनचं करिश्मा कपूरशी अफेअर होतं. 2002 मध्ये अभिषेक आणि करिश्माचा साखरपुडाही ठरला होता, मात्र काही महिन्यातच तो मोडला. 2007 मध्ये अभिषेक आणि ऐश्वर्याचं लग्न झालं आणि तेव्हापासून करिश्मा आणि ऐश्वर्यामध्ये सर्व काही ठीक नसल्याच्या चर्चांना सुरुवात झाली होती.

तर दुसरीकडे कतरिना आणि रणबीर कपूरही या पार्टीत एकत्र पाहायले मिळाले. कतरिनाशी ६ वर्षांचं रिलेशनशिप तुटल्यानंतर रणबीर कतरिनाची खूप जवळची मैत्रिण आलियाला डेट करू लागला. ब्रेकअपपासूनच या दोन्ही सेलिब्रिटींमधला विस्तव काही केल्या जात नाही मात्र या पार्टीत इतर एक्स कपल्ससारखेच रणबीर- कतरिनाही वावरताना दिसले.