बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी’ चित्रपटात काम करणारी अभिनेत्री फ्लोरा सैनीचे नाव राज कुंद्रा प्रकरणाशी जोडले जात होते. फ्लोराने राज कुंद्रा आणि उमेश कामत यांच्याशी संवाद साधला असल्याचे म्हटले जात होते. आता यावर फ्लोराने प्रतिक्रिया देत चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मी कधीही राजला भेटले नाही असे फ्लोरा म्हणाली आहे.

एका वृत्तवाहिनीने काही व्हॉट्सअॅप चॅटद्वारे फ्लोरा राज कुंद्रा आणि उमेश कामतच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. तसेच या चॅटमध्ये फ्लोराला राजचे नवे अॅप बॉलिफेमच्या एका गाण्यासाठी साईन केल्याचा दावा देखील केला जात होता. आता फ्लोराने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करत या प्रकरणाशी काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Flora Saini (@florasaini)

दरम्यान, फ्लोराने ईटाइम्सला देखील मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘कास्टिंगवाले कधीही तुम्हाला फोन करतात. त्यांनी मला वेब सीरिजविषयी सांगितले आणि मी त्यात काम करण्यास इंटरेस्टेड आहे का? असे विचारले. मी त्यांना नकार दिला. मी नवीन प्लॅटफॉर्मसाठी काम करत नाही. कारण त्यांचे बजेट खूप कमी असते’ असे फ्लोरा म्हणाली.

पुढे ती म्हणाली, ‘हे प्रकरण पॉर्नशी संबंधीत आहे आणि यामध्ये माझे नाव घेतले जात आहे. मी या प्रकरणात सहभागी असेन असे सर्वांना वाटत आहे. मी फिल्मी कुटुंबातील नसल्यामुळे माझे नाव मला विचारल्याशिवाय या प्रकरणात ओढणे योग्य नाही. अशा अफवा पसरवणे चुकीचे आहे.’