News Flash

इरफान खानचा मुलगा बाबिल खानने मागितली आईची माफी ; इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिलं….

".....यासाठी मी तुमची माफी मागतो !"

दिवंगत अभिनेते इरफान खानचा मुलगा बाबिल खानने त्याची आई सुतपा सिकदर यांची माफी मागितली. बाबिलने सोशल मीडियावर फोटो शेअर करत एक भावूक पोस्ट लिहून ही माफी मागितली. यात बाबिल आईला म्हणाला, “फक्त तुम्हीच आहात ज्या माझी काळजी घेत असतात…”. यासोबतच त्यांची कायम काळजी घेईल असं वचन देखील त्याने आईला दिलंय.

बाबिल खानने त्याच्या इस्टाग्राम अकाउंटवर आईचा फोटो शेअर करत ही भावूक पोस्ट लिहिली आहे. यात त्याने लिहिलं, “माझी प्रेमळ आई…मी खूप मूडी आहे…मी यासाठी तुमची माफी मागतो…फक्त तुम्हीच आहात ज्या माझ्या नेहमी काळजी घेत असता, दुसऱ्या कोणाला चिंताच नाही….आय लव्ह यू मम्मा…मी तुमच्यावर खूप प्रेम करतो….आणि मी तुम्हाला जो काही त्रास दिला त्यासाठी तुमची माफी मागतो….मी तुमची कायम काळजी घेईल !.”.

 

View this post on Instagram

 

A post shared by Babil (@babil.i.k)

नुकतंच इरफान खानचा मुलगा बाबिल खानने एक खुलासा केला होता. यात त्याने त्याच्या डेब्यू प्रोजेक्टचं पहिलं शेड्यूल पूर्ण केलं असल्याची माहिती दिली होती. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी सुद्धा एक मेकींग व्हिडीओ रिलीज केला आहे. या मेकींग व्हिडीओमध्ये बाबिल खान दिसून येतोय. ‘क्वाला’ असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अन्विता दत्त करणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री तृप्ती डिमरी हिची देखील महत्वाची भूमिका असणार आहे. तसंच या चित्रपटात स्वस्तिका मुखर्जी सुद्धा दिसणार आहेत.

बाबिल खान डेब्यू करत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती अनुष्का शर्मा करणार आहे. नुकतंच नेटफ्लिक्स आणि अनुष्का शर्मा यांनी एक छोटासा व्हिडीओ शेअर केलाय. चित्रपटाची शूटिंग सुरू असताना हा मेकिंग व्हिडीओ काढलाय. या व्हिडीओमध्ये बाबिल खान, तृप्ती डिमरी तसंच त्यांच्यासोबत कास्ट आणि क्रू देखील दिसून येत आहेत. हा व्हिडीओ एका बर्फाळ जागेवर शूट करण्यात आलाय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Babil (@babil.i.k)

दिग्दर्शक अन्विता दत्तने सांगितलं, या चित्रपटाची कथा एका आई-मुलाच्या नात्यावर आधारित आहे. ‘क्वाला’ ही एक प्रेक्षकांच्या मनाला छेदणारी कथा आहे. यात आईचं मन जिंकण्याचा प्रयत्न केला जातो. मला सध्या खूपच क्रिएटीव्ह व्यक्तींसोबत काम करण्याची संधी मिळतेय. यात तृप्ती, बाबिल आणि स्वस्तिका हे देखील त्यात सामील आहेत…अनुष्का शर्मा आणि नेटफ्लिक्स यांच्यासोबतच काम करताना मला खूप आनंद होतोय….यापूर्वी मी ‘बुलबुल’ चित्रपट केला होता, आता ‘क्वाला’ हा चित्रपट करतेय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2021 3:26 pm

Web Title: bollywood irfan khan son babil khan apologized to mother sutapa sikdar wrote this by sharing photo on instagram prp 93
Next Stories
1 वडिलांच्या निधनानंतर अजुनही सावरली नाही हिना खान ; म्हणाली,”कुणाशी बोलायची इच्छा होत नाही..”
2 “त्या मित्रांनीच पाठीत सुरा खुपसला”; श्रेयस तळपदेचा खळबळजनक खुलासा
3 ‘वाँटेड’ हीरो!
Just Now!
X