04 March 2021

News Flash

श्रीदेवी यांच्या सुपरहिट गाण्यांवर जान्हवी धरणार ठेका, सोनमच्या संगीतची जोमात तयारी सुरु

बी- टाऊनची फॅशनिस्टा अभिनेत्री सोनम कपूर ८ मे रोजी विवाहबंधनात अडकणार असून, कपूर कुटुंबियांकडून याविषयीची अधिकृत माहिती देण्यात आली.

सोनम कपूर, श्रीदेवी, जान्हवी कपूर

बी- टाऊनची ‘फॅशनिस्टा’ अभिनेत्री सोनम कपूर लवकरच विवाहबंधनात अडकणार असून, मंगळवारीच कपूर कुटुंबियांकडून याविषयीची अधिकृत माहिती देण्यात आली. सोनमच्या लग्नाचे वारा आता फक्त कलाविश्वातच नव्हे, तर चाहत्यांच्या वर्तुळातही वाहू लागले आहेत. आपल्या आवडत्या अभिनेत्रीची ही ‘बिग फॅट पंजाबी वेडिंग’ नेमकी कशी असेल यावषयी आता अनेकांना उत्सुकता लागून राहिली आहे. कपूर कुटुंबियसुद्धा मोठ्या उत्साहात लाडक्या सोनमच्या लग्नासाठी सज्ज होत असून श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूरही यात मागे नाही.

सोनमच्या लग्नापूर्वी होणाऱ्या संगीत, मेहंदी वगैरे सोहळ्यांची तयारी शेवटच्या टप्प्यात आली आहे. तिच्या संगीत सोहळ्यात बरेच बॉलिवूड सेलिब्रिटी परफॉर्म करणार असल्याचं म्हटलं जात आहे. सोनमच्या संगीतमध्ये चार चाँद लावणाऱ्या सेलिब्रिटींची यादी मोठी असून यात जान्हवी कपूरच्या नावाचाही समावेश झाला आहे. बॉलिवूड पदार्पणासाठी मेहनत घेणारी जान्हवी सोनमच्या संगीतसाठी फार उत्सुक असून, ती आपल्या आईच्या म्हणजे दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या काही गाजलेल्या गाण्यांवर परफॉर्म करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ‘मेरे हाथों मे नौ नौ चुडिया है’, ‘किसे के हाथ ना आएगी’ या आणि अशा इतरही सुपरहिट गाण्यांचा समावेश असल्याचं म्हटलं जात आहे. जान्हवीशिवाय अभिनेता रणवीर सिंग आणि अर्जुन कपूरही सोनमच्या संगीतमध्ये कल्ला करणार असल्याचं कळत आहे.

वाचा : UPSC results: मदरशातील शिक्षकाची यशोगाथा, जिंकली केंद्रीय लोकसेवा आयोगाची शर्यत

सोनम आणि आनंद अहूजा या बहुचर्चित जोडीच्या लग्नाच्या चर्चांना आता वेगळंच वळण मिळालं असून, अनेकांनाच ८ मे या तारखेची प्रतिक्षा लागून राहिली आहे. अभिनय आणि फॅशन जगतात आपला ठसा उमटवणाऱ्या सोनमला तिच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यास आता सुरुवात झाली असून, येत्या काळात हे वातावरण आणखी आनंददायी होईल हे खरं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2018 12:53 pm

Web Title: bollywood jhanvi kapoor finalized her song to perform in sonam kapoor and anand ahuja marriage she might dance on mere hathon me
Next Stories
1 आलियाच्या चित्रपटाला एकही कट न देता सेन्सॉर ‘राजी’
2 नर्गिसच्या आयुष्यात नव्या नायकाची एंट्री?
3 PHOTO : अनुष्का, फक्त तुझ्यासाठी…
Just Now!
X