News Flash

डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यात पाहायला मिळणार बॉलिवूडची झलक

मनस्वी ममगई या सोहळ्यात एक डान्स परफॉर्मन्स करणार आहे.

छाया सौजन्य- एएनआय

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी लवकरच पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्यामध्ये बॉलिवूडचेही रंग दिसणार आहेत, त्यामुळे सध्या अनेकांचेच लक्ष या शपथविधी सोहळ्याकडे लागलेले पाहायला मिळत आहे. दरम्यान, अभिनेता अजय देवगणसोबत ‘अॅक्शन-जॅक्सन’ चित्रपटात झळकलेली अभिनेत्री मनस्वी ममगई या सोहळ्यात एक डान्स परफॉर्मन्स करणार आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचारमोहिमेतही महत्त्वाची भूमिका बजावरी मनस्वी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. दरम्यान, ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याबद्दल एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना मनस्वी म्हणाली की, ‘या शपथविधी सोहळ्यामध्ये बॉलिवूडची झलक पाहता येणार आहे. बॉलिवूड स्टाईलमध्ये या कार्यक्रमादरम्यान अनेकांचेच मनोरंजन होणार आहे’. डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा देत भारताच्या दृष्टीने ते अमेरिकेचे आतापर्यंतचे सर्वोत्तम राष्ट्राध्यक्ष ठरणार आहेत. कारण त्यांनी आतापर्यंत भारताला नेहमीच पाठिंबा दिला आहे असा विश्वासही मनस्वीने व्यक्त केला.
डोनाल्ड ट्रम्प २० जानेवारीला अमेरिकेचे ४५ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. मनस्वी भारताची रिपब्लिकन हिंदू कोलिशनची अॅम्बेसेडर असून ट्रम्पदेखील रिपब्लिकन पक्षाचे आहेत. त्यामुळे मनस्वी या सोहळ्यात सहभागी होणार असून यामध्ये इतरही बॉलिवूडचे कलाकार असण्याची शक्यता आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी झालेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसोबत झालेल्या मुलाखतीचा खुलासा करताना मनस्वी म्हणाली होती की, ‘ते फारच विनोदी स्वभावाचे आहेत. आमच्यामध्ये आता एक प्रकारचे कौटुंबिक वातावरण तयार झाले आहे. आम्ही त्यांना भेटलो तेव्हा तेथे (त्यांची मुले) इवांका, डॉन आणि एरिकही होते. आम्ही विविध विषयांवर चर्चा केली. त्यात काही खासगी गोष्टी आणि भारतातील घडामोडींवरही चर्चा झाली’. मनस्वीप्रमाणेच तिच्या वडिलांनीही ट्रम्प यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. त्यावेळी ते म्हणाले की, ‘ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार मनस्वी ही आतापर्यंत ट्रम्प यांनी पाहिलेली सर्वात सुंदर भारतीय मुलगी आहे. त्यांनी मनस्वीची प्रशंसा करत तिला बॉलिवूडमध्ये चांगल्या भूमिका मिळतील असे म्हटले. पण, मनस्वीचा हॉलिवूडकडील ओघ पाहून तिला हॉलिवूड पदार्पणात मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे’.

मनस्वी ही एक भारतीय अभिनेत्री आणि सुपरमॉडेल आहे. तिने बराच काळ अमेरिकेत व्यतीत केल्यामुळे तिचा जास्त ओघ हॉलिवूडकडेच आहे. मनस्वीचे वडिल शलाभ कुमार यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचारमोहिमेतही महत्त्वाची भूमिका बजावली होती. भारत आणि अमेरिकेमधले राजकिय संबध सुधारण्यात शलाभ हे महत्वाचा दुवा मानले जातात. डोनाल्ड ट्रम्प आणि शलाभ कुमार यांच्याच फार चांगले नाते असून त्यांच्या या नात्याची आता मनस्वीच्या हॉलिवूड पदार्पणासाठी काही मदत होणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2017 12:11 pm

Web Title: bollywood jhatkas matkas at donald trumps swearing in ceremony on jan 20
Next Stories
1 जाणून घ्या, रिंकू राजगुरु सध्या करतेय तरी काय?
2 सुशांत-रणवीरमध्ये ‘ऑल इज नॉट वेल..’
3 कोण होतीस तू, काय झालीस तू
Just Now!
X