News Flash

रानू मंडल यांच्याबद्दल भाजपाच्या नेत्याचे मोठे वक्तव्य, म्हणाले…

रानू मंडल यांनी नुकतेच एका सिनेमासाठी गाणे रेकॉर्ड केले

रानू मंडल

सोशल नेटवर्किंगवर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रातोरात एखादी व्यक्ती सेलिब्रिटी झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. याच व्यक्तींच्या यादीमध्ये आता रेल्वे स्टेशनवर गाणं गाणाऱ्या रानू मंडल यांच्या नावाचा समावेश झाला आहे. रेल्वे स्थानकावर गाणं गाणाऱ्या रानू यांच्या मधूर आवाजातील गाण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशभरामध्ये त्यांच्या नावाची चर्चा आहे. आता तर थेट राजकीय नेतेही त्यांच्या आवाजाची दखल घेताना दिसत आहेत. भाजपाचे नेते कैलास विजयवर्गीय यांनी ट्विटवरुन रानू यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं आहे. ट्विटवरुन रानू यांचा व्हिडिओ शेअर करत त्यांनी त्यांच्या गाण्याबद्दल आपले मत मांडले आहे.

रानू यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बॉलिवूड अभिनेता आणि गायक हिमेश रेशमियाने त्याच्या आगमी चित्रपटात त्यांना गाण्याची संधी दिली. या रेकॉर्डींगच्या व्हिडिओही व्हायरल झाला आहे. हाच व्हिडिओ विजयवर्गीय यांनी रिट्विट केला आहे. हे ट्विट करताना त्यांनी संगीतकार आणि गायक शंकर महादेवन आणि लता मंगेशकर यांनाही टॅग केले आहे. आपल्या ट्विटमध्ये विजयवर्गीय म्हणतात, ‘बंगालमध्ये प्रतिभेची कमतरता नाही. कोलकाता रेल्वे स्थानकावर गाणं गाऊन जगणाऱ्या रानू मंडलजी यांच्यामधील प्रतिभा योग्य पद्धतीने हेरली. आता त्यांची लोकप्रियता वाढताना आपल्याला दिसत आहे.’

हिमेश रेशमियाला म्हणाले धन्यवाद

याच ट्विटमध्ये विजयवर्गीय यांनी हिमेश रेशमियाचेही आभार मानले आहेत. ‘या गायिकेला संधी देणारे गीतकार हिमेश रेशमिया जी यांचेही आभार,’ असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे.

विजयवर्गीय यांनी शंकर महादेवन यांना या ट्विटमध्ये टॅग केल्याने त्यांनी ते रिट्विट केले आहे.

विजयवर्गीय आणि बंगाल कनेक्शन काय

कैलास विजयवर्गीय हे सध्या बंगालमध्ये भाजपाचे नेतृत्व करत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने लोकसभा निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जींचे वर्चस्व असणाऱ्या अनेक ठिकाणींनी मोठे मताधिक्य मिळवून भाजपाच्या ऐतिहासिक विजयात मोलाचा वाटा उचलला होता.

बंगालच्या आहेत रानू मंडल

कैलास विजयवर्गीय यांच्या ट्विटमध्ये बंगालमधील प्रतिभेचा उल्लेख करण्यामागील कारण म्हणजे रानू मंडल या पश्चिम बंगालमधील आहेत. रानाघाट येथील असणाऱ्या रानू यांना बॉलिवूडमध्ये संधी मिळाल्यानंतर बंगालमधील हलचालींकडे आजही आपले लक्ष असून राज्यातील एका महिलेला एवढी लोकप्रियता मिळाल्यानंतर तिचे बंगाल कनेक्शन दाखवत तिची स्तृती करण्यासाठी विजयवर्गीय यांनी हे ट्विट केल्याची चर्चा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2019 4:15 pm

Web Title: bollywood kailash vijayvargiya compliments ranu mondal and himesh reshammiya for teri meri kahani scsg 91
Next Stories
1 नाही! मी बिग बींची कॉपी केलेली नाही.. – संजय दत्त
2 दक्षिणेचा नवा सुपरस्टार प्रभास, ‘साहो’साठी २४ तास सिनेमागृह राहणार खुले ?
3 Article 370: ‘जम्मू काश्मीरमध्ये राहत असलेल्या सासू, सासऱ्यांसोबत २२ दिवसांपासून संपर्क नाही’
Just Now!
X