27 October 2020

News Flash

photos : ‘या’ शहरात होणार कतरिनाचं बर्थडे सेलिब्रेशन

सध्या कतरिना तिच्या कुटुंबियांबरोबर परदेशवारी करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

कतरिना कैफ

बॉलिवूडमध्ये अत्यंत कमी कालावधीत लोकप्रियतेच शिखर गाठणारी अभिनेत्री कतरिना कैफचा आज ३५ वा वाढदिवस. त्यामुळे कतरिनाच्या या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन होणार यात शंका नाही. विशेष म्हणजे कतरिना आणि तिच्या घरातल्यांनी तिच्या वाढदिवसाचं एक खास प्लॅनिंग केलं असून सध्या कतरिना तिच्या कुटुंबियांबरोबर परदेशवारी करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

कतरिना तिच्या फॅमिलीला देत असलेल्या या क्वालिटी टाईमचे काही फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
सोशल मीडियावर सतत अॅक्टीव्ह असणारी कतरिना सध्या न्युयॉर्कमध्ये सुट्टी घालवत असून यावेळी एन्जॉय करतानाचे काही फोटो तिने शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोमध्ये कतरिना कुल अंदाजात दिसत असून तिच्याबरोबर तिच्या मैत्रिणीही असल्याचं पाहायला मिळत आहे. या फोटोला कतरिनाने ‘गर्ल्स न्युयॉर्कमध्ये’ असं कॅप्शन दिलं आहे.

Haydreaming ….

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

त्याबरोबर कतरिनाने आणखी एक फोटो शेअर केला असून यात ती एका उंच ठिकाणी रिलॅक्स मूडमध्ये बसल्याचं दिसून येत आहे. तर आणखी एका फोटोमध्ये ती तिच्या बहिणींबरोबर समुद्र किनारी मस्ती करताना दिसत आहे.

Out to sea

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

दरम्यान, वाढदिवस असल्यामुळे कतरिना खूपचं आनंदी असून ती न्युयॉर्कमध्ये तिचं बर्थडे सेलिब्रेशन करणार आहे. या सेलिब्रेशनसाठी कतरिनाने तिच्या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढल्याचं पाहायला मिळत आहे. कतरिनाचा आगामी ‘झिरो’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून तिच्याबरोबर शाहरुख खान स्क्रिन शेअर करणार आहे. तसंच ती ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’मध्येही झळकणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2018 3:22 pm

Web Title: bollywood katrina kaif is on holiday on her birthday
Next Stories
1 Bigg Boss Marathi : रेशमला ही चूक पडली महागात?
2 ..म्हणूनच न्युयॉर्कच्या रस्त्यावर थिरकली प्रियांकाची पावले
3 श्रीदेवी नव्हे, तर या अभिनेत्रीची फॅन आहे जान्हवी
Just Now!
X